27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रकाँग्रेस- राष्ट्रवादीची बैठक 'या' कारणामुळे रद्द; सत्तास्थापनेचा पेच कायम!

काँग्रेस- राष्ट्रवादीची बैठक ‘या’ कारणामुळे रद्द; सत्तास्थापनेचा पेच कायम!

लय भारी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सूटावा यासाठी दिल्लीत आज होणारी काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांची आजची बैठक रद्द झाली आहे. मात्र, अचानक बैठक रद्द झाल्यानंतर वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलतानास सांगितले, आज माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती आहे. जयंतीनिमित्त दिल्लीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे आघाडीची बैठक रद्द करण्यात आली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांची आज दिल्लीत बैठक होणार होती. मात्र आज देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बरेच काँग्रेसचे नेते तिकडे व्यस्त असतील. त्यामुळे आजची बैठक रद्द करण्यात आली असून ही बैठक उद्या होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील हे नेते उपस्थित असणार आहेत. काँग्रेसकडूनही केंद्रातील आणि राज्यातील महत्त्वाचे नेते बैठकीसाठी हजर असतील, अशी माहिती सुनिल तटकरे यांनी दिली आहे. या बैठकीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा होईल आणि पुढील रणनीती निश्चित करण्यात येईल. त्यामुळे या बैठकींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी