27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रहिंदुत्त्ववादी विचारांची शिवसेना झाली सेक्युलर

हिंदुत्त्ववादी विचारांची शिवसेना झाली सेक्युलर

लय भारी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेसाठी एकत्र आले आहेत. हिंदुत्त्ववादी विचारांची शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत, आले तर कसे जुळवून घेईल, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्या देशाचीू घटना आणि देश, सेक्युलर या संकल्पनेवर आधारित आहे. जात धर्म पंथ पाहून कोणालाही मदत केली जात नाही. आम्ही देशाच्या घटनेचा आदर करतो, असं राऊत यांनी सांगितलं.

राऊत म्हणाले, कोणालाही मदत करताना जात धर्म पंथ पाहून मदत केली जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील सर्व धर्मियांना एकत्र घेऊन राज्य स्थापन केलं होतं. आम्ही देशाच्या घटनेचा आदर करतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देशातील एकमेव असे नेते होते ज्यांनी न्यायालयात कुराण, भगवतगीतेवर हात ठेवून शपथ घेण्याऐवजी संविधानावर हात ठेवून शपथ घेतली होती. या घटनेचीही राऊत यांनी आठवण करून दिली. मात्र, शिवसेनेच्या या  भूमिकेबद्दल सोशलमीडियावर विरोधात जोरदार चर्चा सुरु आहे.

शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार स्थापन होणार

शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात १ डिसेंबरपूर्वी मजबूत सरकार स्थापन होईल. बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पार पडलेली बैठक ही सकारात्मक झाली. सरकार स्थापनेसंदर्भात त्यांनी काही निर्णय घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. अशी माहिती शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत दिली.

राऊत यांनी सांगितले की, बैठकीनंतर आघाडीच्या काही नेत्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली आहे. बुधवारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये काय चर्चा झाली याबाबत मी वक्तव्य करणं योग्य नाही. परंतु या बैठकीत सरकार स्थापनेसंदर्भात काही निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. किमान समान कार्यक्रमावर कालची बैठक आधारीत होती. ही बैठक सकारात्मक झाली असून येत्या दोन दिवसांमध्ये यावर अंतिम निर्णय होईल,” असं मत राऊत यांनी व्यक्त केलं. तसंच “राज्यात स्थिर सरकार आणण्यासाठी तिन्ही पक्ष आग्रही आहेत. यापुढील सर्व निर्णय हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जाणार आहेत,” असंही ते म्हणाले.ि

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची उद्या मुंबईत बैठक होईल. आम्हाला पाच वर्ष सरकार चालवायची आहे. काँग्रेसचे नेतेही बैठकांसदर्भातील माहिती काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना देत आहे. सध्या तरी त्यांची भेट घेण्याचं कोणतही नियोजन नसल्याचंही, राऊत यांनी स्पष्ट केलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी