28 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeटॉप न्यूजVIDEO : हेमामालिनींनी मांडली समस्या, माकडे फ्रुटी – सामोसे – पेढे खातात,...

VIDEO : हेमामालिनींनी मांडली समस्या, माकडे फ्रुटी – सामोसे – पेढे खातात, अन् त्रासही देतात

लय भारी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : भाजपच्या खासदार व अभिनेत्री हेमामालिनी यांनी एका विचित्र समस्येला वाचा फोडली. लोकसभेच्या सभागृहात त्यांनी ही समस्या मांडून सगळ्या सदस्यांचे लक्ष वेधले. आपल्या मतदारसंघात माकडांचा माणसांना त्रास होत आहे, तर माकडांनाही माणसांचा त्रास होत आहे. माकड व मानव या दोघांनाही सुरक्षितता मिळावी यासाठी वन विभागाने उपाययोजना करावी अशी मागणी हेमामालिनी यांनी केली.

त्या म्हणाल्या की, माकड म्हटलं की लोकांना थट्टेचा विषय वाटतो. पण हा विषय थट्टेचा नाही. तो गंभीर विषय आहे. माझ्या मतदारसंघात मथुरा व वृंदावन इत्यादी ठिकाणी माकडांची संख्या वाढली आहे. ही माकडे लोकवस्तीत वावरतात. लोकांना त्रास देतात. लोकांकडून माकडांना फ्रुटी, सामोसे, पेढे खायला दिले जातात. हे खाद्यपदार्थ खाल्ल्याने माकडांना आजार होत आहेत. या आजारांचा संसर्ग माणसांमध्येही पसरला आहे.

माकडांची उत्पत्ती कमी व्हावी म्हणून प्रशासनाकडून त्यांचे निर्बजीकरण केले जात आहे. परंतु त्यामुळे माकडांमध्ये संताप वाढला आहे. ही माकडे मग लोकांवर हल्ला करीत असल्याची चिंता हेमामालिनी यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी