27 C
Mumbai
Saturday, June 15, 2024
Homeमहाराष्ट्र'व्हाय आय किल्ड गांधी' चित्रपटावर बाळासाहेब थोरात यांनी मांडले मत

‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटावर बाळासाहेब थोरात यांनी मांडले मत

टीम लय भारी

मुंबई:- राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे  हे आगामी चित्रपटात नथुराम गोडसे  याच्या भूमिकेत दिसणार आहेत. काही नेत्यांनी कोल्हे यांच्या या निर्णयावर टीका केली आहे तर काहींनी संयमी भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही याबद्दल आपलं मत मांडलं आहे.(Balasaheb Thorat’s opinion on ‘Why I Killed Gandhi’)

थोरात म्हणाले की. ‘कलाकार हा कलाकार असतो. त्याच्या कलेला बंधन असू नये. मात्र, एखाद्या भूमिकेतून चुकीच्या विचारांचं उदात्तीकरण होणार नाही याची काळजी घेतली जायला हवी.

हे सुद्धा वाचा

नथुराम गोडसेच्या भूमिकेवर राजकीय नेते आणि सर्वसामान्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझाच्या मेव्हण्याची आत्महत्या

अभिनेता किरण मानेंची भावूक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

NCP leader Amol Kolhe plays Godse in short film, puts party in a fix

कोल्हे यांच्या भूमिकेतून नथुराम गोडसे याचं उदात्तीकरण होऊ नये, असं थोरात म्हणाले. ‘ज्यांच्या नेतृत्वामुळं देशाला स्वातंत्र्य मिळालं, ज्यांच्या विचारांमुळं देश आज प्रगती करतो आहे, त्यांच्या विरोधात ही भूमिका नसावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

‘व्हाय आय किल्ड गांधी’  नावाचा हिंदी चित्रपट येत्या महिनाअखेरीस ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे ट्रेलर आल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हे यांच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.  नवाब मलिक यांनी मात्र सामंजस्याची भूमिका घेतली आहे.

‘अमोल कोल्हे यांनी २०१७ साली ही भूमिका केली होती. मात्र, ते गांधीजींच्या हत्येचं वा त्यांच्या मारेकऱ्यांच्या विचाराचं समर्थन करत नाहीत असं त्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे, असं मलिक म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी