28.2 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeटॉप न्यूजशरद पवारांनी शिवसेना स्टाईलमध्ये दिला ‘हा’ आदेश

शरद पवारांनी शिवसेना स्टाईलमध्ये दिला ‘हा’ आदेश

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज एकत्रित बैठक झाली. या बैठकीत शरद पवार म्हणाले, ‘माझा आदेश आहे की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारावे.’ पवार यांच्या या ‘आदेशा’नंतर उद्धव ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्रीपदासाठी तयारी दशर्विली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता नवाब मलिक यांनी शरद पवारांच्या या शिवसेना स्टाईल आदेशाची माहिती पत्रकारांना दिली.

नवाब मलिक म्हणाले की, आज तिन्ही पक्षांची बैठक झाली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील, असे ठरले आहे. तिन्ही पक्षांच्या वतीने राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे सत्ता स्थापन करण्याचा दावा केला जाईल. शिवाजी महाराजांना आदर्श माणून आमचे सरकार काम करेल. कोणत्याही जाती जाती – धर्माचे हे सरकार नसेल. सामान्य जनतेचे हे सरकार असेल. शिवसेनेचा जन्म महाराष्ट्राच्या हितासाठी झाला होता. उलट भाजपसोबत जाऊन शिवसेना बिघडली होती. शिवसेनेसोबत आम्ही केवळ पाच वर्षे नाही, तर दहा, वीस, पंचवीस वर्षे एकत्र राहू. भाजपचा अंत होण्याची ही चिन्हे आहेत. भाजपचे नेते अहंकारी झाले होते. महाराष्ट्राने त्यांच्या अहंकार संपविला आहे.

 

सकाळी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला. त्यानंतर आपल्याकडे बहुमत नाही, हे भाजपच्या लक्षात आले. घोडेबाजार करून आमदार फोडण्याचा भाजपचा प्रयत्न होता. हंगामी विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून आणखी खटाटोप करण्याचा त्यांचा डाव होता. परंतु न्यायालयाने उद्याच्या बहुमत चाचणीचे थेट प्रक्षेपण करण्यास सांगितले होते. त्यामुळे भाजपला हा घोडेबाजार करता येणार नव्हता. कायदा, नियम मानणार नाही अशी भाजपची नीती आहे. पवार साहेबांनी कालच सांगितले होते की, हे मणीपूर, गोवा, कर्नाटक नाही. हा महाराष्ट्र आहे. शेवटी महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेचा विजय झाला आहे. त्यामुळेच फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला – नवाब मलिक

हे सुद्धा वाचा

कालिदास कोळंबकर हंगामी विधानसभा अध्यक्ष, उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

…अन् भाजपच्या नेत्यांचे चेहरे उतरले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही राजीनामा, शिवसेनेवर डागली पुन्हा तोफ

काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी