28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रभीमथडी जत्रेत पुणेकरांच्या भेटीला विठूराया 

भीमथडी जत्रेत पुणेकरांच्या भेटीला विठूराया 

लय भारी न्यूज नेटवर्क 
पुणे  : ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘भीमथडी’ जत्रेचे आज, बुधवारी 14व्या वर्षात मोठ्या थाटात पदार्पण झाले.
पुणे शहरात दरवर्षी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनंदाताई पवार यांच्या संकल्पनेतून भीमथडी जत्रेचे आयोजन केले जाते. या जत्रेत राज्यातील बचत गटांच्या वस्तु विक्रीचे दरवर्षी प्रदर्शन भरवून बचत गटांना आर्थिक सक्षम बनवण्याचे काम केले जाते. आज बुधवारी पुणे येथे ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, ह.भ.प. केशव महाराज नामदास, ह.भ.प. मधुकर महाराज मोरे, ह.भ.प. योगेश महाराज पालखीवाले, ह.भ.प. कृष्णराव चोपदार, राजभाऊ चोपदार, अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे राजेंद्र पवार, भीमथडी जत्रेच्या आयोजिका सुनंदा ताई पवार, रमेश आप्पा थोरात यांच्या उपस्थितीत या भीमथडी जत्रेचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले.
भीमथडी जत्रेत पुणेकरांच्या भेटीला विठूराया 
महाराष्ट्राची संस्कृती म्हणून जगभर पंढरपुरची वारी प्रसिद्ध आहे. या संस्कृतीचे संवर्धन म्हणून भीमथडी जत्रेमध्ये वारीच्या संकल्पनेचा विचार करण्यात आला आहे. निष्ठा, सेवा, श्रद्धा, कला, संस्कृती आणि अध्यात्म याचे दर्शन व्हावे या उद्देशाने पंढरीच्या वारीची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे भीमथडी जत्रेत आयोजन करण्यात आले आहे.
भीमथडी जत्रेत पुणेकरांच्या भेटीला विठूराया 
नेहमीप्रमाणेच यंदाही आगळी-वेगळी भीमथडी जत्रा करण्याचा संस्थेने प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागातील कलाकारांना त्यांची कला दाखवता यावी यासाठी त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय ग्रामीण भागातील बारा बलुतेदारांनाही व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.शंभर वर्षांपूर्वी खेडे कसे होते याचे जिवंत चित्रण मागील आठ भीमथडी जत्रेमध्ये दाखविण्यात आले. या वर्षी पिंगळा, वासुदेव, ज्योतिषी, नंदीबैल, कुंभार, बुरुड, जागरण, गोंधळी, पोतराज, मरिआईचे भक्त, आदिवासी कला, तारफा, सनई-चौघडा अशा अनेक कलाकारांचा या जत्रेत सहभाग आहे. तसेच ग्रामीण भागातील खाद्य परंपरा शाकाहारी व मांसाहारी या दोन्ही रुपात चाखण्यास मिळणार आहे. घुटं, हुलग्याचे माडगे, मांडे, धपाटे, मोदक, पुरण पोळी, पिठलं-भाकरी, चुलीवरचं मटण, गावरान कोंबडी अशा अस्सल गावराण जेवणाचा तडका पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे.
भीमथडी जत्रेत पुणेकरांच्या भेटीला विठूराया 
भीमथडी जत्रेत गुरुवारी (ता. १९) रात्री राजस्थानी कला संस्कृतीचे दर्शन या कार्यक्रमाचे खास आकर्षण असणार आहे. शुक्रवारी (ता. २०) हिंदुस्थानी / सूफी संगीताने भीमथडी जत्रा मंत्रमुग्ध होणार असून शनिवारी (ता. २१)  ढोल-ताशाच्या तालात मराठी गाण्याचा आधुनिक संगम अनुवता येणार आहे. उद्या १९ रोजी खासदार सुप्रियाताई सुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी