29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
HomeमुंबईVIDEO : राजू शेट्टी यांचा सदाभाऊंवर वार, ‘महाविकास आघाडी’ सरकारलाही दिले आव्हान

VIDEO : राजू शेट्टी यांचा सदाभाऊंवर वार, ‘महाविकास आघाडी’ सरकारलाही दिले आव्हान

टीम लय भारी

मुंबई : कडकनाथ कोंबडी प्रकल्पात गुंतवलेले पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे नैराश्य आलेल्या प्रमोद जमदाडे या तरूणाने मंगळवारी आत्महत्या केली. त्यासाठी सागर खोत याच्या पोलिसांनी मुसक्या आवळाव्यात अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला आहे. खोतवर कारवाई केली नाही तर पोलिसांविषयी आणि सरकारविषयी सुद्धा संशय निर्माण होईल, असे गर्भित आव्हान त्यांनी ‘महाविकास आघाडी’ सरकारला दिले आहे.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, पन्हाळा (कोल्हापूर) तालुक्यातील प्रमोद जमदाडे नावाच्या तरूणाने मंगळवारी आत्महत्या केली. गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्याने त्याने आत्महत्या केली आहे. त्यामुळे पोलिसांनी आता शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत न बघता तातडीने सागर खोतवर गुन्हा दाखल करावा. कारण शेतकऱ्यांनी व आत्महत्या केलेल्या तरूणाच्या कुटुंबियांनी थेट सागर खोतवर आरोप केला आहे. घोटाळा करणारा कितीही मोठा असला तरी त्याच्या मुसक्या आता आवळल्याच पाहिजेत. नाहितर पोलिसांच्याच आणि एकूणच सरकारच्या वर्तनाबद्दल संशय यायला कुठेतरी जागा निर्माण होईल.

VIDEO : राजू शेट्टी यांचा सदाभाऊंवर वार, ‘महाविकास आघाडी’ सरकारलाही दिले आव्हान
जाहिरात

महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड आणि राजस्थान या चार – पाच राज्यांमध्ये कडकनाथ कोंबडी घोटाळा झाला आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जवळपास २००० कोटींची फसवणूक झाली आहे. फसणवूक करणारे आज राजरोसपणे फिरत आहेत. सरकार त्यांना जामीन देत आहे. शेतकरी मात्र आत्महत्या करीत आहे, अशा शब्दांत शेट्टी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

Breaking : रविकांत तुपकर यांचे स्वाभिमानीमध्ये पुनरागमन

आदित्य ठाकरे जे बोलले, ते त्यांनी करून दाखवले

देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर तुकाराम मुंढे, एकूण २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी