27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
HomeमुंबईEknath Shinde : धगधगत्या मशालीला तळपत्या सूर्याचे आव्हान; बाळासाहेबांच्या शिवसेनेचे चिन्ह ठरलं!

Eknath Shinde : धगधगत्या मशालीला तळपत्या सूर्याचे आव्हान; बाळासाहेबांच्या शिवसेनेचे चिन्ह ठरलं!

वाढता वाद लक्षात घेता येत्या अंधेरी पोट निवडणुरीसाठी निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह वापरास बंदी घातली असल्याने आता ठाकरे आणि शिंदे गटासमोर नवे नाव आणि चिन्ह सादर केले आहे. ठाकरे गटाकडून धगधगती मशाल असे चिन्ह देण्यात आले असून शिंदे गटाकडून तळपता सूर्य निवडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

शिवसेनेच्या गोटात सध्या मोठी धावपळ पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचे दोन गट पडल्यामुळे सध्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी शिवसेना स्थिरावलेली पाहायला मिळत आहे. शिंदे सेना आणि ठाकरे सेना हा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला असल्यामुळे खरी शिवसेना आमचीच असा दावा दोन्ही गटांकडून पाहायला मिळत आहे. वाढता वाद लक्षात घेता येत्या अंधेरी पोट निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह वापरास बंदी घातली असल्याने आता ठाकरे आणि शिंदे गटाने नवे नाव आणि चिन्ह सादर केले आहे. ठाकरे गटाकडून धगधगती मशाल असे चिन्ह देण्यात आले असून शिंदे गटाकडून तळपता सूर्य निवडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह रद्द केल्यामुळे शिंदे गटाने सुद्धा आपल्या गटाचे नाव बाळासाहेबांची शिवसेना असे ठेवले आहे. गटाच्या नव्या नामांतरानंतर आयोगाच्या सूचनेनुसार त्यांनी तीन चिन्हांचा पर्याय सादर केला होता. दरम्यान या तीन चिन्हांपैकी ‘तळपता सूर्य’ या चिन्हावर निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या धगधगत्या मशालीला तळपत्या सुर्याचे उत्तर मिळणार अशा उलट सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

निवडणूक आयोगाकडून सोमवारी ठाकरे गटाला ‘शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे’ (Shivsena – Uddhav Balasaheb Thackeray) या नावाला मंजूरी देत त्यांच्या मशाल हे चिन्ह दिले होते. तर, त्याचवेळी शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ (Balasahebanchi Shivsena) हे नाव दिले होते परंतु शिंदे गटाकडून सादर केलेले सगळेच चिन्ह फेटाळून लावले होते. त्यानंतर आज सकाळपर्यंत म्हणजेच मंगळवारी नवीन चिन्ह सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचे पालन करत ई-मेल द्वारे तळपता सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड हे पर्याय निवडणूक आयोगाला शिंदे गटाकडून पाठवण्यात आले.

हे सुद्धा वाचा…

INDvsSA ODI : शेवटच्या वनडे सामन्यात पावसाची शक्यता? वाचा काय सांगतोय हवामानाचा अंदाज

Kapil Dev: मला डीप्रेशन सारखी अमेरीकन संकल्पना पटत नाही; कपिल देवचे वादग्रस्त विधान

Pune News: आजपासून दररोज मध्यरात्री चांदणी चौकातील वाहतूकीला ब्रेक!

दरम्यान, ठाकरे गटाकडून त्रिशुळ, उगवता सूर्य आणि  मशाल अशा चिन्हांचा पर्याय देण्यात आला होता, त्यापैकी धार्मिक महत्त्व असल्याचे सांगत त्रिशुळ हे चिन्ह वापरता येणार नसल्याचे सांगण्यात आले तर उगवता सुर्य तामिळनाडूतील द्रमुक पक्षाचे असल्याचे ते सुद्धा वापरता येणार नसल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, शिंदे गटाच्या तळपत्या सुर्याला आयोगाकडून मान्यता मिळणार असल्याची शक्यता वर्तण्यात येत असून आता अंधेरी पोटनिवडणूकीत धगधगती मशाल विरोधात तळपता सुर्य अशी लढाई रंगणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळातून जोर धरू लागली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी