30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeव्हिडीओBharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेला राज्यात पहिल्याच दिवशी प्रचंड उत्साह

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेला राज्यात पहिल्याच दिवशी प्रचंड उत्साह

'नफरत छोडो, भारत जोडो' असा नारा देत सुरु झालेली राहुल गांधींच्या नेतृत्वातील 'भारत जोडो' यात्रा नांदेडमध्ये सोमवारी रात्री दाखल झाली. महाराष्ट्रात पॉल ठेवताच राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले.

‘नफरत छोडो, भारत जोडो’ असा नारा देत सुरु झालेली राहुल गांधींच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो’ यात्रा नांदेडमध्ये सोमवारी रात्री दाखल झाली. महाराष्ट्रात पॉल ठेवताच राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी धगधगती मशाल घेऊन भारत जोडो पद यात्रा सुरु केली. पुढील 18 दिवस राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो पदयात्रा 328 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच अनेक संघटना सहभागी होणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा या यात्रेत सहभागी होणार आहेत.

गुरुनानक जयंतीच्या पहिल्या दिवशीच महाराष्ट्रातून भारत जोडो यात्रेला प्रारंभ झाल्याने आणि आजच गुरुनानक जयंती असल्याने राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेत्यांनी नांदेड येथील गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतले. भारत जोडो यात्रेच्या पहिल्या दिवशी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे तसेच इतर नेते सहभागी झाले.

भारत जोडो यात्रेमध्ये अनेक संघटना सहभागी झाल्या आहेत. यात्रेमध्ये सहभागी झालेल्या लोकांमध्ये सुद्धा प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. यावेळी राहुल गांधी हे यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांशी संवाद सुद्धा साधत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी