31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeक्राईममारामारी करुन फरार झाला, पोलिसांनी 35 वर्षांनंतर मुसक्या आवळल्या

मारामारी करुन फरार झाला, पोलिसांनी 35 वर्षांनंतर मुसक्या आवळल्या

जोगेश्वरी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी मारामारीच्या गुन्ह्यातील आरोपीला 35 वर्षानंतर अटक केली आहे. आरोपीच नाव पेटबली यादव उर्फ चिकू यादव अस असून तो गेली 35 वर्ष फरार होता. आरोपी नाव बदलून राहत होता.
मुंबईतील परिमंडळ 10चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी आणि मेघवाडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ अविनाश पालवे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील फरार गुन्हेगार यांची शोध मोहीम सुरू केली आहे. यावेळी जोगेश्वरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांनी ही त्यांच्या पोलीस स्टेशनच्या फरार गुन्हेगा. र यांची शोध मोहीम सुरू केली होती. यावेळी त्यांच्या 150/1989 या क्रमांका गुन्हा नोंद असून तो 326 , 144 कलमा नुसार नोंद आहे.

या गुन्ह्यात चिकू यादव उर्फ पेटबली यादव हा फरार गुन्हेगार जोगेश्वरी मध्ये येत असल्याची माहिती मिळाली.यानंतर कधी बातमीदार याची मदत घेऊन , तर कधी पाळत ठेवून चिकू याच्या मागावर होते. अखेर चिकू काल जोगेश्वरी येथे आला असता त्याला अटक करण्याचे आली.

हे सुद्धा वाचा

राज्याचे 6 बस चालक ठरले ‘हिरोज ऑन द रोड’चे मानकरी

एकनाथ खडसे यांच्या जावयाला जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार

अतिकच्या हत्येची भविष्यावणी आधीच मिळाली नाही का? बागेश्वर बुवा नेटकऱ्यांकडून ट्रोल  

चिकू याच्या विरोधात मारमारीची केस दाखल आहे. ही केस 1989 सालातील आहे.सुरुवातीला त्याला अटक झाली होती. त्यावेळी त्याला जामीन मिळाला होता. त्यानंतर तो कधी कोर्टात आलाच नाही.यामुळे न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. तसं रेकॉर्ड जोगेश्वरी पोलीस स्टेशनमध्ये होत. त्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याला अटक करून कोर्टाच्या समोर हजर करण्यात आलं असता कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी