29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रऔरंजेबाच्या समर्थनार्थ स्टेट्सवरून शरद पवारांची प्रतिक्रिया म्हणाले,...

औरंजेबाच्या समर्थनार्थ स्टेट्सवरून शरद पवारांची प्रतिक्रिया म्हणाले,…

कोल्हापूर मध्ये मंगळवारी काही तरूणांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून औरंगजेबच्या समर्थनार्थ स्टेट्स टाकल्याने वाद निर्माण झाला आहे. या पोस्टच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनेच्या लोकांनी कोल्हापुरात लक्ष्मीपुरा पोलीस ठाण्याबाहेर आंदोलने केली. हा जमावबंद रोखण्यासाठी पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला.अनेक हिंदूत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंदची घोषणा करण्यात आल्या. कोल्हापुरातील पोलीसांच्या माहितीनुसार ही परिस्थिती आटोक्यात आली असून सर्वांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या स्टेट्स वरुन वांदग निर्माण झाला असुन, औरंगजेबाच्या समर्थनार्थ पोस्ट टाकणाऱ्या तरूणांवर कारवाई करण्याच्या मागण्या या संघटनेंकडून येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी घटनास्थळी जाऊन लोकांना शांततेच आवाहन केले. तसेच पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणात आल्याचे सांगितले

हे सुद्धा वाचा

यावर्षी पाऊस लांबणीवर, शेतकऱ्यांचे आभाळाकडे लागले डोळे

Video : मंत्रालयात घुसले गटाराचे पाणी, महापालिका – मेट्रोने केली PWD ची फजिती ! पावसाळ्याच्या जय्यत तयारीवर फेरले पाणी !

व्यापाऱ्यांनी साठेबाजी केल्याने राज्यात डाळी शंभरीपार..

आक्षेपार्ह स्टेट्स टाकल्याप्रकरणी दोन तरूणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. हिंदुत्ववादी संघटना छत्रपती शिवाजी चौकात एकत्र आल्यानंतर सकाळी 9 वाजल्यानंतर लोकांनी निषेधाला सुरूवात केली. कोल्हापूरमध्ये वाद अजून चिघळू नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत तसेच जमावबंदी देखील लागू केली आहे.

कोल्हापुरात झालेल्या या घटनेनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, ‘काही लोक जाणीवपूर्वक भेदभाव करत आहे. मोबाईलवर कोणी चुकीचा मेसेज पाठवला असला, तरी त्यासाठी रस्त्यावर उतरून धार्मिक स्वरुप देण्याची गरज नाही. राज्यात शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे, पण त्यांच्याशी संलग्न लोक रस्त्यावर उतरू लागले, अहिंसेतून कटूता निर्माण झाल्यास ते बरोबर नाही.जे घडतं ते एकट्याचे काम नाही, त्यामागे बऱ्याच विचारधारा आहे. अशा घटना घडतच आहे. त्यामुळे लहान घटकांना संरक्षण देत कोणी कायदा हातात घेत असेल तर कारवाई करणे सरकारचे काम आहे’

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी