29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रव्यापाऱ्यांनी साठेबाजी केल्याने राज्यात डाळी शंभरीपार..

व्यापाऱ्यांनी साठेबाजी केल्याने राज्यात डाळी शंभरीपार..

आपल्या दररोजच्या जीवनात आवश्यक असलेल्या गोष्टींपैकी डाळ ही एक महत्वाची गोष्ट आहे. काही दिवसांपासुन अनेक गोष्टी महागल्या आहेत त्यापैकी डाळींच्या किंमती मध्ये वाढ झाली आहे. दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री बसत आहे. अवकाळी पावसामुळे उत्पादन घटल्याने डाळींच्या किंमती वाढल्या आहेत

उत्पादन घटल्याने व्यापाऱ्यांनी साठेबाजी केली आहे त्यामुळे राज्यात डाळ महागली आहे. त्यामुळे केंद्राने तुर उडीद डाळींच्या साठ्यावर मर्यादा घातली आहे. ही साठमार्यादा 31 ऑक्टोबर पर्यंत कायम राहणार आहे. याशिवाय तेलाचे दर प्रति लिटर 8 ते 12 रुपयांनी कमी करण्याचा आदेशही केंद्र सरकारने तेल उत्पादक कंपन्यांना दिला आहे.

तूरडाळ ही 115 ते 140 रूपयांवर गेली आहे तर मूगडाळीत 80 वरून 98 ते 120 रूपये वाढ झाली आहे. उडीद डाळ ही 95 रूपयांवरून 101 रूपयांवर गेली आहे. डिसेंबर महिन्यात डाळींच्या दरात 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर मार्चंमध्ये 105 रूपये आणि मे मध्ये 140 रूपयांनी वाढ झाली आहे.

हे सुद्धा वाचा 

Video : मंत्रालयात घुसले गटाराचे पाणी, महापालिका – मेट्रोने केली PWD ची फजिती ! पावसाळ्याच्या जय्यत तयारीवर फेरले पाणी !

मंत्री शंभूराज देसाई यांचे आजोबाप्रेम; बाळासाहेब देसाई यांच्यावरील चरित्र ग्रंथाचे राजभवनावर प्रकाशन !

देशात मुस्लिम, ख्रिश्चन समाजाविषयी चिंता वाटावी असे चित्र – शरद पवार 

सहा महिन्यांत तूरडाळीच्या दरात 25 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात डाळींच्या किमतीत घट झाली आहे. डाळींच्या किमतीमधील वाढ रोखण्यास केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. डाळींच्या तुटवड्यामुळे हे भाव वाढले आहेत नवीन हंगाम सुरू होईपर्यंत ही तेजी अशीच राहू शकते असे सुत्रांकडून समजले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी