27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeक्रिकेटमहाराष्ट्र प्रिमियर लीगचा आजपासून थरार, कधी आणि कुठे पाहता येणार सामने

महाराष्ट्र प्रिमियर लीगचा आजपासून थरार, कधी आणि कुठे पाहता येणार सामने

महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) ची उद्घाटन आवृत्ती आजपासून सुरू होणार आहे. यात तब्बल सहा संघ प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकण्यासाठी एकमेकांशी भिडणार आहेत. एकूण 19 सामने खेळले जातील आणि साखळी टप्प्यात राऊंड-रॉबिन फॉरमॅटचा अवलंब केला जाईल. ऋतुराज गायकवाड, केदार जाधव, राहुल त्रिपाठी आणि राजवर्धन हंगरगेकर या आयपीएलमधील काही अव्वल परफॉर्मर्स लीगमध्ये भाग घेणार आहेत. एमसीएच्या पुण्यातील स्टेडियमवर पुणेरी बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स या टीमच्या खेळण्याने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. पुण्याचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार आहे. केदार जाधव हा कोल्हापूर संघाचे नेतृत्व करणार आहे.

स्पर्धेचा अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने पुण्याजवळील गहुंजे येथील एमसीएच्या स्टेडियमवर खेळविले जाणार आहे. तर दुपारी 2 व रात्री 8 वाजता सामने होणार आहेत. पुणेरी बाप्पा, कोल्हापूर टस्कर्स, छत्रपती संभाजी किंग्ज, रत्नागिरी जेट्स, ईगल नाशिक टायटन्स, सोलापूर रॉयल्स असे सहा संघ खेळणार आहेत. पुणेरी बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स या संघाचा सामना आज रात्री 8 वाजता होणार आहे. पहिल्या सामन्यापूर्वी 5.30 वाजता दिमाखदार सोहळ्याने स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

हे सुध्दा वाचा:

मुंबई लोकल मध्ये 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार,आरोपी अटकेत

बिपरजॉय चक्रीवादळाचा गुजरातला धोका, 74 हजार लोकांचे स्थलांतरण

शिवकृपा पतपेढीवर संस्थापक सहकार परिवर्तन पॅनलचे वर्चस्व

एमपीएलचे वेळापत्रक –

15 जून 2023 –
पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)

16 जून 2023 –
ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (दुपारी- 2 ते 5.20)

रत्नागिरी जेट्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)

17 जून 2023-
कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)

18 जून 2023-
ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (दुपारी – 2 ते 5.20)

पुणेरी बाप्पा विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)

19 जून 2023-
पुणेरी बाप्पा विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)

20 जून 2023-
सोलापूर रॉयल्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (दुपारी- 2 ते 5.20)

रत्नागिरी जेट्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)

21 जून 2023-
ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)

22 जून 2023-
छत्रपती संभाजी किंग्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (दुपारी – 2 ते 5.20)

पुणेरी बाप्पा विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)

23 जून 2023-
सोलापूर रॉयल्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)

24 जून 2023-
पुणेरी बाप्पा विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (दुपारी – 2 ते 5.20)

कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)

26 जून 2023- क्वालिफायर 1
27 जून 2023- एलिमिनेटर
28 जून 2023- क्वालिफायर 2
29 जून2023 – अंतिम सामना

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी