29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रयेत्या ३ ते ४ दिवसांत मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता

येत्या ३ ते ४ दिवसांत मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता

बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात चांगलाच दिसून येत आहे. हवामान बदलामुळे राज्यातील पाऊस लांबणीवर गेला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. दरम्यान पुढील 3 ते 4 दिवस मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तसेच विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तर कोकणात २२ जून नंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेची लाट तर पुढील 3 ते 4 दिवस मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व होण्याची शक्यता आहे. तळकोकणातही अद्याप मोसमी पाऊस सुरु झाला नाही. अनेक जिल्ह्यात पावसाअभावी उष्णतेची लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. तर दोन दिवसात बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. दिल्लीत हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल.

बिपरजॉय चक्रीवादळाने राजस्थानमध्ये थैमान घातले आहे. राजस्थानमधील 500 हून अधिक जास्त गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. राजस्थानात 300 मिमी पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे ब्रम्हपुत्रा नदीच्या पात्रात वाढ झाली आहे. राज्यातील तीन जिल्हे पुराच्या पाण्यात बुडाले आहेत. आसाममधील 38000 नागारिकांना पूराचा फटका बसला आहे.

हे सुध्दा वाचा:

औरंगजेब ५० वर्षे राज्य करून गेला, ते तुम्ही पुसणार आहात का; प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला सवाल

कोस्टल रोडचे काम 76 टक्के पूर्ण; 13 हजार कोटींच्या घरात खर्च,नोव्हेंबर 2023 पर्यंत काम होणार पूर्ण

ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यावर शाईफेक करून हल्ला

बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यात आणि देशात मॉन्सूनच्या प्रगतीला ब्रेक लागला आहे. राज्यात अद्याप मॉन्सून सक्रिय झालेला नाही. दरवर्षी साधारण 15 जून पर्यंत पाऊस राज्यामध्ये पडत असतो, मात्र अद्याप मॉन्सूनची प्रगती ही दक्षिण कोकणच्या पुढे झालेली नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी