28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रपंतप्रधानाच्या हस्ते 5 वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्धाटन

पंतप्रधानाच्या हस्ते 5 वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्धाटन

आज पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटनाचा सोहळा पार पडला. भोपाळ (राणी कमलापती) ते इंदोर वंदे भारत एक्स्प्रेस, भोपाळ (राणी कमलापती) ते जबलपूर वंदे भारत एक्स्प्रेस, रांची ते पटना वंदे भारत एक्स्प्रेस, धारवाड ते बेंगळूरू वंदे भारत एक्स्प्रेस आणि गोवा (मडगाव) ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु झाल्या आहेत. गोवा (मडगाव) -मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ही गोव्यासाठीची पहिलीच वंदे भारत एक्स्प्रेस असणार आहे.

ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघातानंतर वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांचे उद्धाटन पुढे ढकलण्यात आले होते. महाराष्ट्रातून सध्या तीन वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. आता उद्यापासून चौथी वंदे भारत धावणार आहे. मुंबई- गांधीनगर , मुंबई- शिर्डी, मुंबई- सोलापूर, आणि मुंबई- गोवा अशा चार ट्रेन आहेत. कोकण रेल्वे मार्गावर तेजस एक्स्प्रेस ही वेगवान ट्रेन धावत आहे. ही ट्रेन 586 किमी अंतर 8 तास 50 मिनिटात पार करते. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांनाचा एक तास वाचणार आहे.

हे सुध्दा वाचा:

मुंबई, ठाणे, पालघर साठी ऑरेंज अलर्ट; आयएमडीचा इशारा

सैनिक प्रवेश परिक्षेत राजवर्धन भानुसेचा अटकेपार झेंडा

मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस उद्यापासून सुरु होणार, जाणून घ्या वेळापत्रक

या ट्रेनची नियमित सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे 5:25 वाजता पावसाळ्यात सुटेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी साडेतीन वाजता मडगावला पोहोचणार आहे. परतीच्या दिशेने, ट्रेन क्रमांक 22230 मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी 12:20 वाजता मडगावहून सुटेल आणि 10:25 वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल.या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम येथे थांबे असतील. वंदे भारत ट्रेनचा प्रवास आरामदायी असणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी