28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयजयंत पाटलांचे भाचे प्राजक्त तनपुरे अजितदादांच्या भेटीला; इकडे सोनाली तनपुरे यांचे महत्त्वाचे...

जयंत पाटलांचे भाचे प्राजक्त तनपुरे अजितदादांच्या भेटीला; इकडे सोनाली तनपुरे यांचे महत्त्वाचे ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडल्याचे चित्र असून अनेक अजित पवार आणि शरद पवार या दोन गटांत विभागणी झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ आहेत. त्यांचे भाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मात्र आज अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. त्यामुळे प्राजक्त तनपुरे हे अजित पवार यांच्या गटात गेल्याच्या चर्चांना उधान आले, अशातच प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी एक ट्विट केल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळणार की पुढे काही राजकीय नाट्य घडणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या भूकंपानंतर अनेक आमदार, पदाधिकांऱ्यांमध्ये कोणत्या गटाकडे जायचे याबाबत द्विधा मनस्थिती आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे सत्तेच्या लाभासाठी त्यांच्याकडे जायचे कि शरद पवार यांच्याशी असलेली निष्ठा कायम ठेवायची हा अनेकांच्या समोर प्रश्न आहे.
दरम्यान उद्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक मुंबईत होत आहे. अजित पवार याच्या गटाची तसेच शरद पवार यांच्या गटाची बैठक उद्या होत आहे. त्या बैठकीला आमदार, खासदार, आजी माजी आमदार खासदार, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख पक्षाच्या विविध संघटनांचे प्रमुखांपासून ब्लॉक कमिटीच्या पदाधिकांऱ्यांना दोन्ही गटांनी उद्या मुंबईत निमंत्रित केले आहे. त्यामुळे उद्याच्या कोणत्या गटासोबत कोण हे स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान उद्याच्या बैठकी आधीच आज आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भेट घेतल्याने तनपुरे अजित पवार यांच्या गटासोबत गेल्याची चर्चा रंगली होती. तनपुरे हे जयंत पाटलांचे भाचे देखील आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून ते शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ आहेत. जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या पदाधिकाऱ्यांना पक्षातून हकालपट्टीचे सत्र सुरु केले आहे, तर ज्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासंबंधी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे.

प्राजक्त तनपुरे यांनी ट्विटरवरुन शरद पवार यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत मी साहेबांबरोबर असल्याचे ट्विट केले होते. त्यानंतर आज त्यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधान आले होते. अशातच प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तरनुरे यांनी ट्विट करत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. एका व्यक्तीने आमदर प्राजक्त तनपुरे यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याच्या बातमीचा स्क्रीनशॉट पोस्ट करत “मॅडम हे खरं आहे का? असा प्रश्न विचारला होता. त्याला सोनाली तनपुरे यानी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, ”अजित दादांची भेट घेतली ही बातमी खरी आहे. मात्र भेट कशासाठी घेतली याबाबतच्या अफवांमध्ये काही तथ्य नाही.”

हे सुद्धा वाचा

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नवी डोकेदुखी; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अनुभवानुसार खाती पाहिजेत

धुळे- मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, 12 जणांचा जागीच मृत्यू

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; अनेक महत्त्वाचे निर्णय मंजूर

सोनाली तनपुरे यांनी प्रजक्त तनपुरे यांच्याबातब ज्या चर्चांना उधान आला होते. त्या अफवा असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्राजक्त तनपुरे हे अजित पवार यांच्या गटासोबत गेल्याच्या अफवा असल्याचे त्यांनी एकप्रकारे सांगितले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी