27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयशिवसेनेत असताना पावसात बैठका घ्यायचो; भुजबळ यांचा पवारांना खिजवण्याचा प्रयत्न

शिवसेनेत असताना पावसात बैठका घ्यायचो; भुजबळ यांचा पवारांना खिजवण्याचा प्रयत्न

शरद पवार यांचा 2019 मधील साताऱ्यातील पावसात भिजत केलेल्या भाषणाचा फोटो असो की शनिवारी येवला येथे जाताना पावसात कार्यकर्त्यांची घेतलेली भेट आणि त्या भेटीचा फोटो खूप गाजत असताना पवार यांच्याभोवती सहानुभूती शरद पवार निर्माण झाली आहे. ही सहानुभूतीची अभेद्य भिंत तोडण्यासाठी अजित पवार यांनी वयोवृद्ध नेते मंत्री छगन भुजबळ यांना कामाला लावले आहे.

शरद पवार यांचा पावसात भिजल्याचा एक फोटो त्यांच्या गटातील नेत्यांकडून शेअर केला जात आहे. त्यावर भुजबळ म्हणाले, पावसात आम्हीसुद्धा भिजत असतो. साहेबांचं वय आहे, त्यामुळे सहाजिकच लोकांमध्ये त्यांच्यासाठी सहानुभूती निर्माण होते. आम्हीही शिवसेनेत होतो तेव्हा पहाटे ३ ते ४ वाजेपर्यंत बैठका घ्यायचो. प्रचंड पावसात बैठका घ्यायचो. साहेबांचं जे चित्र आहे त्याबद्दल लोकांना प्रेम आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाही. मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार रोहित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. भुजबळ रोहित पवारांना म्हणाले, माझ्यावर टीका करण्यापूर्वी थोडा इतिहास समजून घ्या, तुम्हाला इतिहास ठाऊक नाही. भुजबळ म्हणाले, त्या रोहित पवारला सांगा, मी जानेवारी-फेब्रुवारी १९८५ मध्ये पहिल्यांदा आमदार झालो. एप्रिल १९८५ ला मुंबईचा मुंबईचा महापौर झालो. त्यानंतर चार महिन्यांनी तुमचा (रोहित पवार) जन्म झाला. त्यामुळे मला मोठं केलं, मला कोणी मोठं केलं असल्या फालतू गोष्टी करु नका. आधी इतिहास जाणून घ्या. रोहित पवार म्हणाले, भारतीय जनता पार्टीने शरद पवारांचं घर फोडलं आणि आता मजा बघत आहेत. रोहित पवार यांच्या या आरोपाला छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे.

हे सुद्धा वाचा

झिरवाळांनी वाढवले एकनाथ शिंदे गटाचे टेन्शन; शिंदे गटाचे आमदार म्हणाले अपेक्षेपेक्षा जास्त बोलू नका!

दिलीप वळसे-पाटील यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून यांना मिळणार उमेदवारी !

जगामध्ये नंबर एकचे पंतप्रधान असताना इतर पक्ष फोडण्याची गरज का; उद्धव ठाकरे यांचा सनसनीत टोला

छगन भुजबळ म्हणाले, भाजपाचंही एक कुटुंब आहे. गोपीनाथ मुंडे यांचं एक कुटुंब आहे. ते कुटुंब या लोकांनी फोडलं होतं. धनंजयला तुम्ही गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यापासून दूर केलं. धनंजयला दूर करण्यामागे कोण होतं? तुम्हीच होता. असे बोलून भुजबळ यांनी शरद पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. आता त्याला शरद पवार यांच्या गटकडून काय उत्तर येते हे पहावे लागणार आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी