29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंडे कुटुंब कोणी फोडले याचे उत्तर अजित पवार यांनी सात वर्षापूर्वीच दिले...

मुंडे कुटुंब कोणी फोडले याचे उत्तर अजित पवार यांनी सात वर्षापूर्वीच दिले होते; खरे कोण भुजबळ की पवार

राष्ट्रवादी काँग्रेसमधील गृहकलह रविवारपासून बाहेर पडायला लागल्यानंतर दोन्ही शिवसेना बॅक फूटवर आल्याचे चित्र दिसत आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटातून जोरदार आरोपांचा पाऊस कोसळत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पाणी चांगल्याच पद्धतीने जोखणाऱ्या भुजबळ यांच्यावर आता अजित पवार यांची बाजू सावरण्याची जबाबदारी येऊन ठेपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी ‘भारतीय जनता पार्टीने शरद पवारांचं घर फोडलं आणि आता मजा बघत आहेत.’ असे सांगताच, रोहित पवार यांच्या या आरोपाला छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. हे करताना भुजबळ आपल्याच आपल्याच साफळ्यात अडकले तर नाही ना, अशी शंका घेण्याची जागा त्यांनी सोडली आहे.

2017 च्या एका वाहिनीच्या कट्ट्यावर अजित पवार यांना, ‘मुंडे कुटुंब कोणी फोडले’ याचे उत्तर विचारण्यात आले तेव्हा अजित पवार म्हणाले होते, ‘ (गोपीनाथ ) मुंडे साहेब यांना सोडू नका असा सल्ला पंडित मुंडे आणि धनंजय मुंडे यांना दिला होता.’ त्यामुळे अजित पवार खरे की छगन भुजबळ असा प्रश्न शरद पवार गट भुजबळ यांना विचारू शकतात.

गोपीनाथ मुंडे विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांनी शरद पवार यांच्या विरोधात जोरदार मोहीम हाती घेतली होती. याला साथ मिळाली ती तत्कालीन मुंबई महापालिकेचे उपआयुक्त गो. रा. खैरनार यांची. शरद पवार यांच्याविरोधात ट्रकभर पुरावे देऊ, असे भाषणात जाहीरपणे खैरनार बोलायचे. खैरनार यांच्या भाषणाला गर्दी होऊ लागली, दरम्यानच्या काळात खैरनार यांना निलंबित करण्यात आले. शेवटी ते निवृत्त झाले. या नंतर 90 च्या दशकात शिवसेना भाजपा युतीचे सरकार आले आणि खैरनार, अण्णा हजारे यांचे शरद पवार यांच्या विरोधातील भ्रष्टाचार विरोधी आंदोलन माना टाकू लागले. पण त्यानंतर काही वर्षानी धनंजय मुंडे यांनी काका गोपीनाथ मुंडे यांना रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसचे घडयाळ हातात बांधले. त्यापूर्वी जलसंपदा विभागाची मोठी कामे धनंजय मुंडे यांना अजित पवार यांनी मिळवून दिल्याचेही बोलले जात होते.

हे सुद्धा वाचा 

रायगडचा पालकमंत्री शिवसेनेचा आणि तो भरतशेठच; आमदार भरत गोगावले यांचा अदिती तटकरेंना विरोध

शिवसेनेत असताना पावसात बैठका घ्यायचो; भुजबळ यांचा पवारांना खिजवण्याचा प्रयत्न

झिरवाळांनी वाढवले एकनाथ शिंदे गटाचे टेन्शन; शिंदे गटाचे आमदार म्हणाले अपेक्षेपेक्षा जास्त बोलू नका!

या सगळ्या पार्श्वभूमीवर 2017 रोजी एका वृत्त वाहिनीच्या कट्ट्यावर अजित पवार यांना,’ मुंडे कुटुंब कोणी फोडले’ याचे उत्तर विचारण्यात आले तेव्हा अजित पवार यांनी त्याचे सविस्तर उत्तर दिले. ते म्हणाले, ‘ धनंजय आमच्या पक्षात येण्यापूर्वी दीड वर्ष आधी दिल्लीत पंडित मुंडे आणि धनंजय मुंडे आमच्याकडे आले. पक्षात घुसमट होत असल्याचे म्हणाले. तेव्हा त्या दोघांना सल्ला दिला, ‘ (गोपीनाथ) मुंडे साहेब यांना सोडू नका’ असा सल्ला दिला होता. सव्वा वर्षानंतर हे दोघे भेटायला आले. त्या पक्षात रहायचे नाही, असे म्हणाले. अशी आठवण अजित पवार यांनी सांगितली होती. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना गोपीनाथ मुंडे पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. मनमोहन सिंग यांनी उपनेता पक्ष सोडतो हे काही चांगले नाही असे सांगून त्यांना (गोपीनाथ मुंडे) सुषमा स्वराज यांच्याकडे पाठवले. त्यांनी मुंडे यांची समजूत घातली. त्यामुळे मुंडे साहेब यांनी पक्ष सोडला नाही, अशीही आठवण या मुलाखतीत सांगितली होती.

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी