28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयअजित पवार यांना 36 आमदारांची जुळवाजुळव करणे झाले कठीण, अजित पवार...

अजित पवार यांना 36 आमदारांची जुळवाजुळव करणे झाले कठीण, अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या भेटीला

गेल्या पंधरवड्यात राज्यातील राजकारणात विविध बदल होत आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांना, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती करणार का, असा सवाल माध्यमांनी केला असता , ‘ एकवेळ आम्ही अविवाहित राहू पण लग्न करणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेससोबत कदापि जाणार नाही’ असे डिप्लोमेटीक उत्तर फडणवीस यांनी दिले. त्याच फडणवीस यांच्या उपस्थितीत 2 जुलै रोजी राजभवन येथे अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घातली. राजकारण हा न् समजण्याचा विषय आहे असे सामान्य माणूस म्हणतो ते याचसाठी! त्यामुळे रविवारपासून अजित पवार हे शरद पवार यांची भेट घेत आहेत, यात त्यांना मनोमिलन करायचे की अन्य काही, याचे उत्तर लवकरच मिळणार आहे. सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. रविवारी अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर, आज आमदारही शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले. यशवंतराव चव्हाण सेंटरवर ही भेट होत आहे. महत्त्वाचं म्हणजे स्वत: अजित पवार, सुनील तटकरे शरद पवारांची भेट घेत आहेत. रविवारच्या भेटीत या सगळ्या आमदारांनी शरद पवार यांचे पाय धरले होते. दरम्यान अजित पवार यांना 36 आमदारांची जुळवाजुळव करणे कठीण जात आहे, त्यामुळे ते शरद पवार यांची विनवणी करण्यासाठी जात असल्याचे समजते.

राज्याचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. आज सभागृहाचं कामकाज आटोपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीनंतर सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरकडे रवाना झाले. दरम्यान, शरद पवार हे आपल्या सिल्व्हर ओक निवासस्थानावरुन यशवंतराव चव्हाण सेंटरकडे रवाना झाले. दरम्यान, शरद पवार यांच्यासोबत यावेळी जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार आज शरद पवारांच्या भेटीला आल्याने राज्यासह देशाच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष याकडे लागलं आहे.

हे सुध्दा वाचा:

विरोधी पक्षांची बंगळुर येथे 17, 18 जुलैला बैठक, 24 पक्ष राहणार उपस्थित

अपुऱ्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने चर्चा करण्याची काँग्रेसची मागणी

‘धगधगती मशाल’ कोणाकडे? उद्धव ठाकरे की समता पार्टी, सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

देवगिरी बंगल्यावर रविवारी झालेल्या बैठकीला सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री वाय बी चव्हाण सेंटरला पोहोचले. अजित पवार यांच्या गटाने शरद पवार यांची भेट घेतली. यात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आदींचा सहभाग होता. ही माहिती मिळताच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखीलही तातडीने वाय.बी. चव्हाण सेंटरवर दाखल झाले. मला सुप्रिया सुळेंचा फोन आला म्हणून मी लवकर निघालोय. शरद पवारांनी बोलवलंय, लवकर या असं मला सांगितलं, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी