29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रआपदग्रस्तांच्या मदतीसाठी लालबागचा राजा आला धावून !

आपदग्रस्तांच्या मदतीसाठी लालबागचा राजा आला धावून !

रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळगड वाडीवर दरड कोसळण्याची घटना परवा रात्री घडली. सलग दुसऱ्या दिवशी रेस्कयू ऑपरेशन सुरू आहे. या घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून अद्याप 100 ते 150 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे. या घटनेनंतर इर्शाळवाडीला लालबागचा राजा या मंडळाकडून मदतीचा हात पुढे केला आहे.

या दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागारिकांना काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या सततचा पावसामुळे काल रात्री बचावकार्य थांबवण्यात आलं. आज पहाटे 5 वाजल्यापासून पुन्हा काम सुरू करण्यात आले आहे. तिथल्या ग्रामस्थांची घर जमीनदोस्त झाली आहेत. महिला, पुरुष आणि लहान मुलांचे सर्व अत्यावश्यक कपडे, सुका खाऊ, अन्नपदार्थ आणि जीवनाश्यक पदार्थ इ. वस्तूंची मदत मंडळाकडून करण्यात येणार आहे. दोन मोठ्या टेम्पोमधून ही मदत पोहचवली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा:

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करणार

प्रा. एम. एस. शर्मा विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार या पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या याविषयी अधिक माहिती

एकनाथ शिंदे यांनी जिंकली सामान्य जनतेची मने !

या दुर्घटनेत गावातील 25 ते 35 घरे माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. दरम्यान इर्शाळवाड येथे सध्या एनडीआरएफच्या बचाव पथकासोबत पनवेल महापालिकेचे बचाव पथक, सिडकोचे मजूर आणि स्थानिक ट्रेकर्सचा एक गटही मदतकार्य करत आहे. दरडी कोसळून घरांवर सुमारे 30 ते 35 फुटांचा दगड- मातीचा थर साचला आहे. त्यामुळे हा ढिगारा काढणे कठीण होत आहे. इर्शाळवाडीवर पोहोचण्यास निसरडी पायवाट असल्यामुळे मदतकार्यात प्रचंड अडथळे येत आहेत. डोंगराच्या पायथ्याशी तात्पुरता नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी