29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeराजकीयशरद पवारांचे नरेंद्र मोदींना आव्हान, अजितदादांचा भ्रष्टाचार उघड करा

शरद पवारांचे नरेंद्र मोदींना आव्हान, अजितदादांचा भ्रष्टाचार उघड करा

अजित पवार काही आमदारांसह सत्तेत सहभागी झाले आहेत. पण प्रत्यक्षात मात्र ‘शरद पवार व अजित पवार हे आतून एकच आहेत’. पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नावर शरद पवार यांनी थेट उत्तर दिले आहे. आमच्यात कसलीही एकजूट नाही. आगामी निवडणुकांमध्ये अजित पवार गटाला जनता जागा दाखवून देईल, असे स्पष्टपणे शरद पवार यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर, जलसंपदा घोटाळा व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याची चौकशीही नरेंद्र मोदी सरकारने करावी, असे थेट आव्हान सुद्धा शरद पवार यांनी यावेळी दिले. शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव घेतले नाही. परंतु जलसंपदा व शिखर बँकेचा उल्लेख करून त्यांनी थेट अजित पवारांवरच तोफ डागली.

विरोधी पक्षांची एकजूट असलेल्या ‘इंडिया’ची बैठक ग्रँट हयात हॉटेलमध्ये सुरू होणार आहे. या संभाव्य बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्यासह विविध नेते उपस्थित होते. इंडियातील घटक पक्ष एकत्र येवून पुढील निवडणुका लढवणार आहोत. पहिल्या दोन बैठका एकत्र येण्याच्या दृष्टीने महत्वाच्या होत्या. निवडणुका कशा लढायच्या, जागा वाटप कसे करायचे याबाबत मुंबईतील या बैठकीत चर्चा होऊ शकते, असेही शरद पवार म्हणाले.

मायावती यांचा भाजपसोबत सुसंवाद आहे. त्यामुळे त्यांची नक्की भूमिका काय आहे हे समजून घेतल्यानंतर त्यांच्याही इंडियातील समावेशाविषयी निर्णय घेतला जाईल, असे पवार म्हणाले. विविध राजकीय पक्ष आम्ही एकत्र आलो आहोत. पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे भरपूर पर्याय आहेत. पण आम्ही एकत्र येवून त्यावर चर्चा करू, असेही पवार म्हणाले.

पंतप्रधान पदाच्या चर्चेवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे भरपूर पर्याय आहेत. पण भाजपकडेच पर्याय नाहीत. नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपचा सगळीकडे पराभव होत आहे. कर्नाटकात भाजपचा दारूण पराभव झाला आहे. लोकांचा मोदी यांच्या चेहऱ्यावर विश्वास राहिलेला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेचा पंतप्रधान होऊ शकतो का, असा पत्रकारांनी प्रश्न विचारला असता. मी उद्याच जातो आणि पंतप्रधानपदाची शपथ घेतो, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडविली.

‘सामना’तून सतत शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली जाते, याकडे लक्ष वेधले असता, आम्ही ज्या पक्षाबरोबर असतो त्यांच्यावर टीका करतो. पूर्वी भाजपवर टीका करायचो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात व देशात सरकार दिसत नाही. मणीपूरमध्ये महिलांची धिंड काढली जाते. महिला कुस्तीपटूंना आंदोलन करावे लागते. महिलांना सुरक्षित वातावरण राहिलेले नाही, असे ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा 

धनंजय मुंडेंनी साजरा केला रक्षाबंधन, जाणून घ्या बहिणीचे नाव
शरद पवारांच्या ओठात काय, पोटात काय?; इंडियाच्या उद्याच्या बैठकीकडे लक्ष
योगी आदित्यनाथ यांना रक्षाबंधनानिमित्त मुलींनी बांधली राखी

देशाची सुरक्षा करण्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. तानाशाही, जुमलेबाजीपासून देश वाचवायचा आहे. लोकांना स्वातंत्र्य हवे आहे. भाजप चले जावची गरज आहे. देशाला विकास हवा आहे, आणि स्वातंत्र्य सुद्धा हवे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सरकार गॅसवर आहे. त्यामुळे सिलेंडरचे भाव कमी केले आहेत. इंडियाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सिलेंडरचे भाव कमी केले असल्याचे ठाकरे म्हणाले. गेल्या नऊ वर्षात नरेंद्र मोदी यांना बहिणींची आठवण झाली नाही. आताच कशी झाली, असाही सवाल ठाकरे यांनी विचारला.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी