30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयएअर होस्टेसने असे केले इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांचे स्वागत; व्हिडीओ व्हायरल...

एअर होस्टेसने असे केले इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांचे स्वागत; व्हिडीओ व्हायरल !

इस्त्रोची चांद्रयान 3 मोहीम नुकतीच यशस्वी झाली. या मोहिमेमुळे चंद्रावर पोहचणारा भारत हा चौथा देश ठरला असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा पहिला देश ठरला आहे, चांद्रयानाच्या यशस्वी मोहिमेनंतर जगभरातून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक होत आहे. इस्त्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांचा विमान प्रवासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे, या व्हिडीओत एअर होस्टेस आणि प्रवाशांनी सोमनाथ यांचे स्वागत केले आहे.

इस्त्रोची चांद्रयान 3 मोहिम एस. सोमनाथ यांच्या नेतृत्वात आखली होती. चांद्रयान 2 मोहीम शेवटच्या टप्प्यात अयश्वी झाल्यानंतर इस्त्रोचे शास्त्रज्ञ उसंत न घेता पुन्हा नव्या जोमाने चांद्रयान 3 च्या मोहिमेसाठी तयारीला लागले होते. याच दरम्यान रशियाची लूना 25 ही चंद्रावरील मोहीम अयशस्वी झाल्याने अवघ्या जगाच्या नजरा भारताच्या चांद्रमोहीमेकडे लागल्या होत्या.

गेल्या आठवड्यात इस्त्रोचे विक्रम लॅंडर चंदाच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले. त्यानंतर प्रज्ञान रोव्हरने देखील चोखपणे काम करण्यास सुरुवात केली आहे. प्रज्ञान रोव्हरने नुकताच चंद्रवार ऑक्सिजनचा शोध घेतला आहे. चांद्रयान 3 च्या मोहिमेनंतर एस. सोमनाथ यांचे नाव चर्चेत आले आहे.

हे सुद्धा वाचा 
देवेंद्र फडणवीसच सुपर सीएम, एकनाथ शिंदे फक्त चेहरा; नाना पटोलेंची मिश्किल टीका
आम्हाला जीव द्यावा लागला तरी बेहत्तर; मुंबईसाठी जितेंद्र आव्हाड यांचा दिल्लीश्वरांना इशारा
बदला घेण्यासाठी मी शाहरुख सोबत काम केलं, ‘जवान’ मधील या कलाकाराचा गौप्यस्फोट

इस्त्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ इंडीगो एअरलाइन्सने प्रवासासाठी निघाले होते. यावेळी इंडीगो एअरलाईन्सच्या एअर होस्टेसने त्यांचे स्वागत केले. इंडीगो एअर लाइन्सने प्रवास केल्याबद्दल त्यांचे आभार देखील मानले. हा व्हिडीओ एका ट्विटर युझरने पोस्ट केला असून हजारो लोकांनी तो पाहिला आहे. एस. सोमनाथ यांच्या नेत्तृत्वात भारताची चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्यामुळे इस्त्रो ही भारताची अंतराळ संशोधन संस्था एक प्रबळ संस्था म्हणून गणली जाऊ लागली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी