31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रफडणवीसांनी गुन्हा केला म्हणून माफी मागितली, जालना लाठीचार्जप्रकरणी नाना पटोलेंचा घणाघात

फडणवीसांनी गुन्हा केला म्हणून माफी मागितली, जालना लाठीचार्जप्रकरणी नाना पटोलेंचा घणाघात

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज बुधवारी, (6 सप्टेंबर) गडचिरोली जिल्ह्यात जनसंवाद यात्रा काढली होती याा निमित्ताने त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेवरून नाना पटोले यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. तसेच मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीवरील लक्ष्य दुसरीकडे वळवण्यासाठी जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणविस यांच्यावर केला.

जनसंवाद यात्रेदरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, “मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात शांततेने आंदोलन सुरु असताना शुक्रवारी पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. पोलीसांनी निर्दयीपणे मारहाण केली, लोकांची डोकी फोडली. मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु होती त्याला देशभर प्रसिद्धी मिळत होती त्यावरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी हा प्रकार जाणीवपूर्वक केला आहे. फडणवीसांनी गुन्हा केला म्हणून तर माफी मागितली.”

पटोले पुढे म्हणाले की, “जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर केलेला लाठीमार हे राज्य सरकारने जाणीवपूर्वक केलेले पाप आहे. आरक्षण देताना कोणाच्याही तोंडचा घास हिरावून घेऊ नका व तणाव निर्माण करु नका. ओबीसी ही आग आहे, त्या आगीत हात टाकू नये एवढाच सरकारला आमचा सल्ला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जातनिहाय जनगणना हाच मार्ग आहे. केंद्र सरकारने जातनिहाय जनगणा करावी सर्व समाज घटकांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. भाजपाला आरक्षण देता येत नसेल तर त्यांनी केंद्र व राज्यातील सत्तेतून खाली उतरावे आम्ही मराठा समाजासह सर्व समाजाला न्याय देतो.”

जनसंवाद यात्रा गडचिरोली जिल्ह्यात पोहचली असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे यात्रेचे नेतृत्व करीत आहे. नाशिक जिल्ह्यात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आलीआणि त्यानंतर संध्याकाळी जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इमरान प्रतापगढी हे उपस्थित होते.

हे ही वाचा 

सोनिया गांधीचे मोदींना पत्र, विशेष अधिवेषनात ‘या’ नऊ मुद्यांवर चर्चा करा…

भाजपा नेत्यांच्या कारखान्यांना वाचवण्यासाठी सरकार उदार झाले, अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचे चेकमेट

इंडिया विरुद्ध भारत वादात आदित्य ठाकरे केंद्र सरकारवर संतापले

विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुलढाणा जिल्ह्यात जनसंवाद यात्रेत सहभाग घेतला. नागपूर जिल्ह्यात माजी मंत्री व काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद कोराडी येथे पदयात्रा काढण्यात आली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी