28.2 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeटॉप न्यूजlockdown : ‘या’ भागात कडक लॉकडाऊनला सुरुवात!

lockdown : ‘या’ भागात कडक लॉकडाऊनला सुरुवात!

टीम लय भारी

वसई : वसई-विरार भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जोरात वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर वसई- विरार मनपाने शहरातील ५ प्रभागात १४ दिवसांच्या कडक लॉकडाऊनला सुरुवात केली आहे. नियम तोडणा-यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला असून तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात रुग्ण संख्या ही वाढ मोठय़ा प्रमाणात होण्याची भीती पालिकेला वाटत आहे. त्यामुळे पालिका आता युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. वसई-विरार शहरातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून तो रोखण्यासाठी प्रशासनापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शहरातील रुग्ण संख्या आता दोन हजारांच्या घरात पोहोचत असून सर्वाधिक रुग्ण हे शहराच्या पूर्वेकडील चाळींच्या परिसरात असल्याचे आढळून आले आहे. या ठिकाणी करोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक असून रुग्णांचे मृत्यू देखील याच भागातील आहेत. यामुळे पालिकेने सर्वेक्षण करून पूर्वेकडील करोनाची जास्त संख्या असलेले अतिसंवेदनशील परिसर निश्चित केले आहेत. या ठिकाणी आता पालिकेने १४ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे.  गुरुवार १८ जूनपासून ही लॉकडाऊन लागू करण्यात आल् असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत.

लॉकडाऊन लागू केलेल्या भागामध्ये वसई पूर्वेकडील वालीव, तुंगारफाटा, फादरवाडी, नालासोपारा पूर्वेकडील गालानगर, शिर्डीनगर, संतोष भुवन, वालई पाडा, वाकण पाडा, वसई फाटा आदी भागांचा समावेश आहे. तसेच विरारमधील गांधी चौक, सहकारनगर आदी भागांचा समावेश आहे. अशी माहिती देताना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

वसई- विरारच्या या भागामध्ये लॉकडाऊन…

  प्रभाग समिती    सी- चंदनसार

’ गांधी चौक विरार पूर्व ( गांधी चौक ते जनकधामपूपर्यंत)

’ सहकारनगर (विठुरमाळी कंपाऊंड ते मथुरा डेअरी)

*  प्रभाग समिती    एफ- धानीव-पेल्हार

’ श्रीरामनगर गेट नंबर १ ते डोंगपाडा रोड

’ धानीवबाग नाका ते वेलकम डेअरी

’ संतोष भुवन

’ वालईपाडा

’ वाकणपाडा

’ वसई फाटा येथील इंदिरा वसाहत, मिल्लतनगर

*  प्रभाग समिती   डी- आचोळे

’ गालानगर (लक्ष्मण अपार्टमेंट ते आनंद वैभव इमारत)

’ शिर्डीनगर (सीमा इमारत ते ख्रिस्तराज अपार्टमेंट)

*   प्रभाग समिती   जी- वालीव

’ तुंगार फाटा ते बाप्पा सीताराम मंदिरापर्यंत

’ फादरवाडी नाका ते विद्यविकासिनी शाळा

’ गणेश माळी यांचे घर ते भगत कंपाऊंड

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी