28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeराजकीयउदयनराजे म्हणाले, गोपीचंद पडळकरांनी मला विचारून वक्तव्य केले नव्हते

उदयनराजे म्हणाले, गोपीचंद पडळकरांनी मला विचारून वक्तव्य केले नव्हते

टीम लय भारी

सातारा :  कोणी कोणावर टीका केली. यांनी त्यांच्यावर. त्यांनी यांच्यावर. मला काही देणेघेणे नाही. टीका करताना मला ( पडळकर यांनी ) विचारले नव्हते ( Udayanraje says, Gopichand Padalkar don’t asked me ). त्यामुळे मी या विषयावर काहीही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.

साताऱ्यामध्ये पत्रकारांनी बोलताना उदयनराजे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, माझी मते मी परखडपणे मांडत असतो. इतरांनी काय मते व्यक्त केली, त्यावर मी काहीही बोलणार नाही.

Mahavikas Aghadi

दरम्यान, साताऱ्यांमधील वैद्यकीय महाविद्यालय मागेच सुरू व्हायला हवे होते. पण ते रखडले. आता नवे सरकार हे महाविद्यालय सुरू करणार असेल तर चांगलेच आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. केंद्रातून काही मदत लागणार असेल तर मी मिळवून देईन असेही उदयनराजे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

गोपीचंद पडळकर शेर, त्यांचे कार्यकर्ते सव्वाशेर !

गोपीचंद पडळकरांनी टीका केली ते बरेच झाले, पवारांचा ‘खरा’ चेहरा समोर आला

कामे कोण करत आहे हे फार महत्वाचे नाही. कोणी का करेना पण कामे मार्गी लागली पाहीजेत असेही उदयनराजे म्हणाले. कोरोनाचा एवढा बाऊ करायला नको. असे अनेक विषाणू आहेत. आपल्यातील अनेकांना ‘कोरोना’ होऊन गेलाही असेल. आपल्या शरीरातील प्रतिकार क्षमतेने त्यावर मात केलेली असू शकते.

उदयनराजे म्हणाले, गोपीचंद पडळकरांनी मला विचारून वक्तव्य केले नव्हते
जाहिरात

‘लॉकडाऊन’मुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. उद्या चोऱ्या माऱ्या वाढतील. लोकांना काम करायचे आहे. सुरक्षा उपाय करून लोकांना कामे करण्यास परवानगी द्यायला हवी असेही उदयनराजे म्हणाले.

आषाढी वारीनिमित्त मी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार होतो. परंतु विठ्ठलाच्या पुजेसाठी प्रमुख दोन – तीन पुजारी आणि सरकारी पाहुणे अशांनाच परवानगी देण्यात आली असल्याचे मला सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मी जाऊ शकत नाही.

उदयनराजे म्हणाले, गोपीचंद पडळकरांनी मला विचारून वक्तव्य केले नव्हते
जाहिरात

राज्यातील या संकटकाळात राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र यायला हवे. या सकंटकाळातून महाराष्ट्र बाहेर यायला हवा असे ते म्हणाले.

उदयनराजे म्हणाले, गोपीचंद पडळकरांनी मला विचारून वक्तव्य केले नव्हते

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी