टीम लय भारी
मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आवाहन केल्यानुसार शुक्रवारी राज्यभरात धनगर समाजाने आक्रमक आंदोलने केली ( Gopichand Padalkar started agitation for Dhangar reservation ). भंडारा उधळत आणि ढोल वाजवत धनगर समाजाने ‘महाविकास आघाडी’ सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीची प्रमाणपत्रे तातडीने द्यावीत, आदिवासींना असलेल्या सगळ्या योजना धनगर समाजासाठी लागू कराव्यात, फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या योजना विद्यमान महाविकास आघाडी सरकारने अंमलात आणाव्यात इत्यादी मागण्यांसाठी धनगर समाजाने राज्यभरात आंदोलन केले ( Gopichand Padalkar asked to Mahavikas Aghadi for schemes to Dhangar ).
पंढरपुरात स्वतः गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो धनगर बांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला. या शिवाय औरंगाबाद, पुणे, सांगली, कोल्हापूर, पिंपरी चिंचवड, नागपूर, परभणी, जालना, नवी मुंबई, सोलापूर इत्यादी ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने आंदोलने करण्यात आली.
जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार व ग्रामपंचायत कार्यालयांसमोर धनगर समाजाने आंदोलने केली.
दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली पंढपुरात भंडाऱ्याची उधळण व ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले.