26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : मराठा आरक्षणासाठी बुद्धिवंतांची समिती स्थापन करा, संभाजीराजेंचा अशोक चव्हाणांना...

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी बुद्धिवंतांची समिती स्थापन करा, संभाजीराजेंचा अशोक चव्हाणांना टोला

टीम लय भारी

नांदेड : भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी नांदेड येथील मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याला (Maratha Reservation) संबोधित करताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ‘छत्रपती शाहू महाराजांनी 200 वर्षांपूर्वी बहुजन समाजाला आरक्षण मिळवून दिले होते. त्यांनी फक्त मराठ्यांना आरक्षण दिले नाही. तर त्या वेळीच्या बहुजन समाजातही मराठा समाजाचा सहभाग होता. मग, आज मराठा समाज मुख्य प्रवाहात का नाही? असा सवाल भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला केला आहे.

मराठा आरक्षणासाठी बुद्धिवंत लोकांची समिती स्थापन करा, असं सांगत संभाजीराजेंनी काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांवर खोचक टीका केली. सुप्रीम कोर्टात भूमिका मांडताना या समितीचा सल्ला घ्या. इथून पुढे चुका न करण्याचा सल्ला संभाजीराजे यांनी सरकारला केलं आहे.

संभाजीराजे म्हणाले, माझा लढा केवळ मराठा समाजासाठी नाही, तर माझा लढा संपूर्ण बहुजन समाजासाठी आहे. न्याय द्यायचा असेल तर सर्वांना समान न्याय द्यायला पाहिजे. मी नेतृत्वासाठी बाहेर पडलो नाही, घटक म्हणून समाजासाठी काम करतो आहे. मराठा समाजाचा सेवक म्हणून काम करायचं आहे, असं मराठा समाज ओबीसीविरोधात नाही, असंही संभाजी राजे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

अनेक कार्यक्रमांना हजारो लोक जमतात. मराठा मेळाव्याला फक्त अडीचशे लोकांना परवानगी. न्याय द्यायचा तर समान न्याय द्या, असंही संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला खडसावून सांगितलं.

मराठवाड्याच्या दौ-यात लोक मास्कच घालत नाही. इतके बिनधास्तपणे नांदेडचे लोक राहतात. आता ज्यांनी घातलेत त्यांनी मी आलोय म्हणून घातलेत. मी त्यांना सांगितलं की मास्क घाला त्याशिवाय जवळ यायचं नाही. पण माझा मनापासून इच्छा आहे की लवकरात लवकर सर्वांनी जवळ यावं. लोकंच जवळ आली नाही तर येऊन उपयोग नाही.

खांद्याला धक्काबुक्की झाल्याशिवाय छत्रपती घराण्याचे आणि मावळ्यांचे नातेच होऊ शकत नाही. समाज अडचणीत असताना त्याचे धक्केबुक्के खाल्ले पाहिजे. यातूनच प्रेम निर्माण होतं. यातूनच जीवाचे संबंध तयार होतात. हेच संस्कार आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि शाहू महाराजांनी दिले असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी