27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeआरोग्यLay Bhari : भारतीय शास्त्रज्ञांनी शोधले कोरोनाचे उपचार; नव्या पद्धतीने संसर्ग रोखता...

Lay Bhari : भारतीय शास्त्रज्ञांनी शोधले कोरोनाचे उपचार; नव्या पद्धतीने संसर्ग रोखता येणार

टीम लय भारी

चेन्नई : कोरोना व्हायरसपासून बचावासाठी संपूर्ण जगभरात लस केव्हा उपलब्ध होईल आणि ती सर्वांना कधी मिळेल याकडे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे भारतीय वैज्ञानिकांनी आता कोरोनावर प्रभावी ठरतील अशी औषधे आणि संभाव्य उपचारांचा शोध (Lay Bhari) लावला आहे.

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या लसीकरणाची तयारी सरकारकडून सुरू असली तरी कमी कालावधीत सगळ्यांनाच लस मिळणे कठीण आहे. काही लाख लोकांनाच लस मिळू शकते. त्यात फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्यसेवेतील कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. मात्र भारतीय वैज्ञानिकांनी आता कोरोनावर प्रभावी ठरतील अशी औषधे आणि संभाव्य उपचारांचा शोध लावला आहे. यामुळे सर्वांना तातडीने आणि सरसकट सगळ्यांना उपचार मिळणे सहज साध्य होणार आहे.

Lay Bhari : भारतीय शास्त्रज्ञांनी शोधले कोरोनाचे उपचार; नव्या पद्धतीने संसर्ग रोखता येणार

वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या औषधांनी कोरोनाच्या उपचारासाठी मोठी मदत होईल. तामिळनाडुच्या अलगप्पा महाविद्यालय आणि स्वीडनच्या केडीएच रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या या शोधानुसार संशोधकांनी औषधे आणि मिश्रणांची एक सुची तयार केली आहे. यावर संक्रमणाच्या उपचारांच्या अनुषंगाने चाचणी केली जाणार आहे. ‘साइंटिफिक रिपोर्टस्’ या जर्नलमध्ये हा लेख प्रकाशित करण्यात आला आहे.

‘ड्रगबँक’ आकड्यांच्या अध्ययनावर आधारीत हा शोध जर्नल ‘साइंटिफिक रिपोर्ट्स’ मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या प्रकाशित लेखातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस कोणत्या पद्धतीने हल्ला करतो. याबाबत अधिक परिक्षण सुरू आहे. या संशोधनाचे प्रमुख वैभव श्रीवास्तव आणि अरूल मुरुगन यांनी दिलेल्या माहितीनुसार या नवीन उपचारपद्धतीमुळे व्हायरसचा प्रसार कमी होण्यासाठी मदत होईल.

श्रीवास्तव यांनी सांगितले की, व्हायरस खूप वेगाने आपला प्रसार वाढवत आहे. कारण व्हायरस प्रोटीनमध्ये सतत बदल होत असतो. श्रीवास्तव यांनी सांगितले की, अशा कोणत्याही औषधामुळे व्हायरसच्या अनेक प्रोटिन्सचा नष्ट करता येऊ शकतं. असे गुण उपलब्ध असतील अशी वेगवेगळी औषध शोधण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी