26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeटॉप न्यूजcorona : ज्यास मेसेज येणार त्याला मिळणार कोरोनाची लस : आरोग्यमंत्री टोपे

corona : ज्यास मेसेज येणार त्याला मिळणार कोरोनाची लस : आरोग्यमंत्री टोपे

टिम लय भारी :

मुंबई : भारतात आणि महाराष्ट्र राज्यात करोना विषाणूच्या फैलावाला प्रतिबंध करणार्‍या लसीकरणाची जोरदार पूर्व तयारी सुरु झालीय. केंद्र सरकारने करोना लसीकरणाबाबत मायक्रो प्लॅनिंग सुरु केलंय. लस (corona) देण्यासाठी कार्यपद्धती असून ज्या तारखेला लस द्यायची आहे त्या संबंधीचा मेसेज त्या व्यक्तीला करण्यात येईल. त्यानंतर ती व्यक्ती आल्यावर ओळख पटवली जाईल. त्यानंतर त्याला लस देण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.

लसीकरणाबाबत केंद्र सरकार माहिती मागवत असून हेल्थ वर्कर्स, अत्यावशक सेवेतील कर्मचारी, 50 वर्षांवरील नागरिक शिवाय इतर आजार असलेले 50 वर्षांवरील नागरिक यांची माहिती एकत्र केली जात आहे, असंही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय.

सुमारे 18 हजार लोकांना ट्रेनिंग द्यायचं काम आता पूर्ण होईल. स्टोरेजसाठी कोल्डचेन व्यवस्था झालीय. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे, त्यासंबंधीचा मेसेज संबंधित व्यक्तीला येईल तो येणार, त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देणार अशा प्रकारचे मायक्रो प्लानिंग सुरु आहे, असेही टोपे यांनी सांगितलं आहे.

करोना विषाणूचा प्रतिबंध करणारी लस केंद्र सरकार पुरवेल, अशी आम्हाला खात्री आहे. जी कामं राज्य सरकारने करायची आहेत ती आम्ही करतोय. लॉजिस्टिक, डेटा या सगळ्याची कामं सुरु आहेत. लसीकरणाच्या परिमाणाबाबत एक युनिट तयार केलंय.

सीरम आणि भारत बायोटेक यांनी लसीकरणाबाबत केंद्र सरकारकडे परवानगी मागितली असून आता निर्णय केंद्राला करायचा आहे, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी