30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रChhagan Bhujbal : भुजबळ म्हणाले, 'भाजपातील 70 % आमदार आमचेच'

Chhagan Bhujbal : भुजबळ म्हणाले, ‘भाजपातील 70 % आमदार आमचेच’

टिम लय भारी

मुंबई : भाजपातील 70 टक्के आमदार आमचेच आहेत, असा गौप्यस्फोट राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी करत याबाबत शरद पवार निर्णय घेतील, असा इशारा दिला आहे. आजी माजी आमदार महाविकास आघाडीत येण्याची इच्छा शरद पवार यांच्याकडे व्यक्त केले असले तरी , मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणाला घ्यायचे कोणाला थांबवायचे हे शरद पवार ठरवतील, असेही भुजबळ म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीतील मेगाभरतीवरून भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वाक्-युद्ध रंगले आहे. हातकणंगले मतदार संघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांच्या पक्ष प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपा फोडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी उप मुख्यमंत्री पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना ‘घरवापसी’ची साद घातली होती. त्यानंतर भाजपाने यावर टीका करण्यास सुरुवात केली. तुमचे आघाडी सरकार उत्तम चालले आहे. मग का आमच्या लोकांना आकर्षित करता? तुम्ही सरकार चालवा, आम्ही विरोधी पक्ष सांभाळू, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. त्यानंतर पुन्हा छगन भुजबळ यांनी भाजपातील 70 टक्के आमदार असल्याचे गौप्यस्फोट केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी