29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रPolitics : महापौर-उपमहापौरांच्या खुर्चीवरून शिवसेना अन् रिपाइंमध्ये वाद !

Politics : महापौर-उपमहापौरांच्या खुर्चीवरून शिवसेना अन् रिपाइंमध्ये वाद !

टिम लय भारी

उल्हासनगर : महापौर आणि आणि उपमहापौर यांच्या खुर्च्यांवरून (Politics) आता उल्हासनगर महापालिकेत नवा वाद होताना दिसत आहे. महापौर आणि उपमहापौर यांच्या खुर्च्या एकसारख्याच असल्यानं सत्ताधारी शिवसेनेनं संताप व्यक्त केला आहे. या मुद्द्यावर शिवसेनेच्या नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. आता यावरून दोन पक्ष समोरा समोर आले आहेत. उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेचा महापौर तर रिपाइंचा उपमहापौर आहे.

एकसारख्या खुर्चीवरून वाद

उल्हासनगर महापालिकेची ऑनलाईन महासभा तब्बल 3 महिन्यांनी पार पडली. ही सभा पार पडल्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी (Rajendra Chaudhary) यांनी नोटीस केलं की, शिवसेनेच्या महपौर लीलाबाई आशान (Leelabai Aashan) आणि उपमहापौर भगवान भालेराव (Bhagwan Bhalerao) यांची एक सारखीच आसन व्यवस्था होती. चौधरी यांनी यावर आक्षेप घेतला आहे.

काय म्हणाले चौधरी ?

महापालिकेत महापौर हे सर्वोच्च पद आहे. उपमहापौरांनी देखील महपौरांसारखीच खुर्ची आणून महापौरपदाचा अपमान केला आहे. हा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे. ऑनलाईन होत असलेल्या महासभेत बोलण्यापासून नगरसेवकांना रोखणं, बोलू न देणं ही उपमहापौरांची दादागिरी शिवसेना सहन करणार नाही असा इशारा देखील चौधरींनी दिला.

उपमहापौर भगवान भालेराव म्हणतात…

यावर बोलताना भालेरा म्हणाले, मी महापौरांचा अपमान केला नाही. प्रत्येक महापालिकेत महापौर, उपमहापौर, आयुक्त आणि सचिव यांच्या एकसारख्याच खुर्च्या असतात. महापौर आणि उपमहापौर यांच्या खर्च्या वेगवेगळ्या असाव्यात असा काही नियम असेल तर दाखवावा.

पुढं बोलताना त्यांनी सांगितलं की, गेल्या काही दिवसात माझी शिवसेना नेत्यांशी जवळकी वाढल्यानं काहींच्या पोटात दुखत आहे. त्यामुळं हा मुद्दा उकरून काढला जात आहे असंही त्यांनी सांगितलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी