31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeसिनेमाअभिनेता वरुण धवनच्या ड्रायव्हरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अभिनेता वरुण धवनच्या ड्रायव्हरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

टीम लय भारी

मुंबई: बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा ड्रायव्हर मनोज साहू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वरुण धवन मंगळवारी वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओमध्ये एका ब्रँडच्यासाठी शूटिंगसाठी गेला होता. त्यावेळी त्याचा ड्रायव्हर मनोज साहू यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले.( Actor Varun Dhawan’s driver dies of heart attack)

वरुण धवन मंगळवारी मेहबूब स्टुडिओमध्ये एका जाहिरातच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. याच दरम्यान संध्याकाळी मेहबूब स्टुडिओच्या आवारात त्याचा ड्रायव्हर नेहमीप्रमाणे शूटींग संपवण्याची वाट पाहत होता. त्याचवेळी अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्याला वरुण धवन आणि त्याच्या टीमने तातडीने जवळच्या लीलावती रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

हे सुद्धा वाचा

‘किचन कल्लाकार’ मध्ये संकर्षणची जागा घेणार ही अभिनेत्री

राज्यभरातून महेश मांजरेकरांच्या ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाच्या वादग्रस्त प्रोमोमुळे संताप व्यक्त

अभिनेते हेमंत बिरजेंचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात, पत्नीही जखमी

NCW red flags Mahesh Manjrekar’s Marathi film, says censor trailer and movie

एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, वरुण धवनच्या टीममधील एका जवळच्या सदस्याने सांगितले की, “मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता मेहबूब स्टुडिओमध्ये ड्रायव्हर मनोज साहू यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तात्काळ त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. मात्र त्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे मनोज साहू यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर वरुण धवन याने स्वत: त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले. यावेळी वरुण बराच वेळ लीलावती रुग्णालयाच्या आवारात उपस्थित होता. तसेच तो सतत डॉक्टरांनी मनोज साहू यांच्या प्रकृतीबद्दल विचारत होता.

मनोज साहू हे वरुण धवनच्या आधी त्याचे वडील डेव्हिड धवनचे ड्रायव्हर होते. त्यानंतर वरुण धवन अभिनेता बनला तेव्हा त्यांनी वरुण धवनसाठी ड्रायव्हिंगचे काम नियमितपणे करायला सुरुवात केली. मनोज साहू गेल्या २५ वर्षांपासून धवन कुटुंबाशी ड्रायव्हर म्हणून जोडले गेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी