29.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयवाईन विक्रीवरुन गोपीचंद पडळकर यांचे सरकारवर टीकास्त्र

वाईन विक्रीवरुन गोपीचंद पडळकर यांचे सरकारवर टीकास्त्र

टीम लय भारी

मुंबई:- राज्यात वाईन विक्रीवरुन राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. वाईन विक्रीच्या निर्णयावर विरोधी पक्ष विरोध करताना दिसत आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांत वाद-विवाद होताना दिसत आहे. अशातच भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केल्याचे पहायला मिळालं आहे.( Gopichand Padalkar’s criticism of the government  sale wine)

जनाब संजय राऊत हे मा. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. या भितीपोटी की ते परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकीबाबत खुलासा करतील. त्यामुळेच राऊतांचं ‘झिंग झिंग झिंगाट’  झालंय.

हे सुद्धा वाचा

वरळीतील जांबोरी मैदानाच्या नामांतरावरून भाजपने चढवला शिवसेनेवर हल्ला

खंबाटकी बोगद्याचे काम तीन महिन्यांत करु, मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष असल्यामुळेच पक्षाची संपत्ती अधिक आहे ,प्रविण दरेकर

BJP Richest Party In 2019-20, Followed By…No, It’s Not Congress: Report

जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावे लागले नाही. ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावे लागले. गावच्या गाव अंधारात लोटली गेली. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला.

“जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर तुम्ही महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाइनलाच विक्रीची परवानगी असणार आहे आणि परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना नाही हे तुम्ही नमूद करणार का? टक्केवारीसाठी वाइन ही दारू नव्हे असे संशोधन करणाऱ्यांचा मी निषेध करतो असे,” गोपीचंद पडळकर म्हणाले.

“शरद पवारांच्या नावाचा वापर करून आपण विक्रीचं समर्थन करताय. मला खात्री आहे की जे पवारांनी आयुष्यात खूप सोसलं आहे आणि त्याची खंतही जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. त्यामुळेच ते महाराष्ट्राच्या तरुण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत,” असे पडळकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्य सरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे विरोधक खूप संतापलेले पहायला मिळत आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोप विरोध करताना दिसत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी