33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयओमायक्रॉन: आदित्य ठाकरेंचं केंद्राला पत्र, लसीकरणाबद्दल मागण्या करताना म्हणाले….

ओमायक्रॉन: आदित्य ठाकरेंचं केंद्राला पत्र, लसीकरणाबद्दल मागण्या करताना म्हणाले….

टीम लय भारी
मुंबई: मुंबईमध्ये ओमायक्रॉन या नवीन करोना विषाणूचा संसर्ग झालेले दोन रुग्ण सोमवारी म्हणजेच ६ डिसेंबर २०२१ रोजी आढळून आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्याचे पर्यटनमंत्री आणि मुंबईचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे ओमायक्रॉन या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काही मागण्या केल्या आहेत. आदित्य यांनी यासंदर्भातील पत्र केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांना लिहिलं असून याबद्दलची माहिती त्यांनीच ट्विटरवरुन दिलीय. आदित्य यांनी केलेल्या मागण्यांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस घेण्यास परवानगी देण्याबरोबरच करोना लसीकरणासाठीचं किमान वयोमर्यादा १८ वरुन १५ करण्याची मागणी आदित्य यांनी केलीय.(Aditya Thackeray letter to the Center demanding vaccination)

मागील काही महिन्यांमध्ये भारतामधील करोना प्रातिबंधक लसीकरण मोहीम ही अगदी जोमाने सुरु आहे. देशामधील नागरिकांना करोना संसर्गापासून सुरक्षित करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. आपल्या देशामधील व्यवहार आणि सर्वसामान्य जीवनक्रम सुरळीत झाला आहे. मात्र आता ओमायक्रॉनचा धोका उद्भवला आहे. याचसंदर्भात मी तुम्हाला दोन गोष्टी सुचवू इच्छितो, असं अदित्य यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.

इकडे येऊन ते गाजर वाटप करुन गेले असतील;आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Shiv Sena : ‘दुःख व्यक्त करून काय होणार? थोडे राजकारण कमी करा, निवडणुकांवरील उधळपट्टी थांबवा’, भंडारा घटनेनंतर शिवसेनेचा केंद्र सरकारवर निशाणा

तसेच मुंबईमध्ये लस घेण्यास पात्र असणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजेच १०० टक्के लोकांचं लसीकरण झालं आहे. तर ७३ टक्के पात्र लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, अशी माहितीही आदित्य यांनी दिलीय. त्यामुळेच दोन लसींच्या डोसमधील कालावधी चार आठवड्यांचा केला तर परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे लसीकरण केलं जातं तसं जानेवारी २०२२ च्या मध्यापर्यंत मुंबईतील सर्व पात्र नागरिकांना दोन्ही डोस देण्याचं उद्दीष्ट पूर्ण करता येईल. यामुळे अधिक लसी लागणार नाहीत किंवा कालावधीमध्येही फार फेरफार करावा लागणार नाही, अशी आशा अदित्य यांनी व्यक्त केलीय.

करोनापासून आपल्या देशाला आणि देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी वरील मागण्यांसंदर्भात तुमच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला आपेक्षा आहे, असंही आदित्य पत्राच्या शेवटी म्हणाले आहेत.

करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूने सोमवारी देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत शिरकाव केला आहे. मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले असून, राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णसंख्या दहावर पोहोचली आहे. तर देशपातळीवर ही संख्या २३ वर पोहचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशामधील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आहे.

PM केअर फंडातून महाराष्ट्राला दिलेले व्हेंटिलेटर खराब अन् बिनकामाचे, विनायक राऊतांचा संसदेत घणाघात

Shiv Sena slams Mamata’s ‘no UPA’ remark, bats for Opposition alliance with Congress

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी