30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeमुंबईजागतिक आदिवासी दिनानिमित्त आदित्य ठाकरेंनी घेतली आरे कॉलनीतील आदिवासी बांधवांची भेट

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदित्य ठाकरेंनी घेतली आरे कॉलनीतील आदिवासी बांधवांची भेट

टीम लय भारी

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 9 ऑगस्ट रोजी आरे कॉलनी येथील आदिवासी पाड्याला भेट दिली आहे. 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून त्यांनी ही भेट दिली आहे (Aditya Thackeray visits tribal brothers in Aarey Colony).

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधव-भगिनींना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर आरे कॉलनीतील आदिवासी पाड्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी आपला सहभाग दर्शवला. याचे काही फोटो त्यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केले आहेत.

जागतिक आदिवासी दिना निमित्त विधानसभा उपाध्यक्षांचा खास कार्यक्रम

मुख्यमंत्र्यांनी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्य संग्रामातील वीरांना केले अभिवादन

Aditya Thackeray visits tribal brothers in Aarey Colony
आदित्य ठाकरे

 

आदित्य ठाकरेंने केले आदिवासी नृत्य

आरे कॉलनीतील आदिवासी पाड्यांना आदित्य ठाकरेंनी भेट दिली. आदित्य यांनी आदिवासींसोबत नृत्य करत त्यांच्या आनंदात आपला सहभाग दर्शवला आहे.

या आधी आदित्य ठाकरे यांनी आरे कॉलनीतील खांबाचा पाडा येथे भेट दिली होती. यावेळी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक अन्नधान्याच्या किटाचे वाटप त्यांनी आदिवासी बांधवांना केले होते. तेथील 52 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी स्वतः या वस्तूंचे वाटप केले होते (They had personally distributed these items to the beneficiaries on a representative basis).

मंत्रालयातील अधिकाऱ्यांना हवीत ‘मलईदार’ पदे, वशिल्यासाठी पुढाऱ्यांच्या शिफारसपत्रांचा खच

BJP holds protests to allow Mumbai local trains for vaccinated people; discussions on, says Aditya Thackeray

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी