महाराष्ट्रराजकीय

भाजपाने भोंगा वाजवताच मुंबई पालिका प्रशासनाला जाग, वरिष्ठ अधिकारी नालेसफाईसाठी रस्त्यावर : आशिष शेलार

भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनावर निशाणा साधला आहे. मुंबईच्या नालेसफाईच्या कामांत होणाऱ्या दिरंगाईच्या विरोधात भाजपाने भोंगा वाजवताच प्रशासन जागे झाले. आता वरिष्ठ अधिकारी रस्त्यांवर उतरले. आमची त्यावर ही नजर आहेच, असे ट्विट् करत शेलारांनी पालिकेला सूचना दिल्या आहेत.

टीम लय भारी 

मुंबई : पावसाळा सुरु होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. दरवर्षी कोसळणाऱ्या पावसात मुंबईची तुंबई होत असते. पावसात मुंबई तुंबू नये म्हणून नालेसफाईचे काम पालिका प्रशासनाकडून कामे सुरु आहेत.त्यावर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनावर निशाणा साधला आहे. मुंबईच्या नालेसफाईच्या कामांत होणाऱ्या दिरंगाईच्या विरोधात भाजपाने भोंगा वाजवताच प्रशासन जागे झाले. आता वरिष्ठ अधिकारी रस्त्यांवर उतरले. आमची त्यावर ही नजर आहेच, असे ट्विट् करत शेलारांनी पालिकेला सूचना दिल्या आहेत. (Ashish Shelar Notice to Mumbai Municipal Corporation

भाजपाने भोंगा वाजवताच मुंबई पालिका प्रशासनाला जाग, वरिष्ठ अधिकारी नालेसफाईसाठी रस्त्यावर : आशिष शेलार

 

नाल्यांसोबत पाथमुखांची सफाई व्हावी.. विशेषतः गिरगाव चौपाटीवरील व्ह्युविंग गॅलरीच्या बांधकामात गँलरी खालील पर्जन्य जलवाहिनीत सिमेंट आणि बांधकाम साहित्य अडकलेले नाही ना ?याची खात्री करावी. कारण गेली काही वर्षे गिरगावमध्ये पाणी तुंबू लागलेय, असा टोला आशिष शेलार यांंनी लगावलाय.

दिखावा नको, काम दिसू दे, यावर्षी पावसाळा मुंबईकरांचा सुखाचा जाऊ दे, असं म्हणत आशिष शेलार यांनी काही सूचना केल्या आहेत.

१. गतवर्षी मिठी नदीचे पाणी उतरत नव्हते त्याचे कारण शोधून उपाययोजना व्हाव्यात.

२. नाल्यांसोबत पाथमुखांची सफाई व्हावी.. विशेषतः गिरगाव चौपाटीवरील व्ह्युईंग गॅलरीच्या बांधकामात गॅलरी खालील पर्जन्य जलवाहिनीत सिमेंट आणि बांधकाम साहित्य अडकलेले नाही ना? याची खात्री करावी. कारण गेली काही वर्षे गिरगावमध्ये पाणी तुंबू लागलं आहे.

३. नालेसफाईत पारदर्शकता असावी, कामांची आकडेवारी जाहीर करावी.

४. छोटे नाले, गटारे यांच्या साफसफाईकडे ही लक्ष देण्यात यावे

५. वृक्ष छाटणी होणे आवश्यक असून दरडी कोसळणाऱ्या भागात उपाय योजना ही आवश्यक आहे.


हे  सुद्धा वाचा –

ठाण्यात 30 एप्रिल ते 1 मे दरम्यान रंगणार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदोत्सव संगीत समारोह

अमोल मिटकरी म्हणतात हनुमान चालीसा, हनुमान स्रोत झालं आता चला डोळ्याला पाणी लावा…

भोंग्यावर दुटप्पी धोरणापेक्षा देशभरासाठी एक राष्ट्रीय धोरण निश्चित करा : संजय राऊत

 

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close