33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमनोरंजनआई मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा 'मायलेक'

आई मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘मायलेक’

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मायलेक' चित्रपटावर सध्या प्रेक्षक भरभरून प्रेम करत असून आई आणि मुलीच्या सुंदर नात्याची गोष्ट सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. चित्रपटातील गाणीही सध्या प्रचंड व्हायरल होत असतानाच आता 'मायलेक'मधील एक भावनिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यापूर्वी 'असताना तू' हे हॅपनिंग गाणे प्रदर्शित झाले होते, जे आई-मुलीच्या नात्यातील जवळीक अधोरेखित करणारे होते. हे नाते तुफान गाजत असताना ‘नसताना तू’ हे सॅड साँग प्रदर्शित झाले आहे. आर्या आंबेकरच्या सुमधुर आवाजातील या गाण्याला क्षितिज पटवर्धनचे शब्द लाभले असून पंकज पडघनने या गाण्याला संगीतबद्ध केले आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मायलेक’ (Mylek) चित्रपटावर सध्या प्रेक्षक भरभरून प्रेम करत असून आई आणि मुलीच्या सुंदर नात्याची गोष्ट सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. चित्रपटातील गाणीही सध्या प्रचंड व्हायरल होत असतानाच आता ‘मायलेक’मधील एक भावनिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यापूर्वी ‘असताना तू’ हे हॅपनिंग गाणे प्रदर्शित झाले होते, जे आई-मुलीच्या नात्यातील जवळीक अधोरेखित करणारे होते. हे नाते तुफान गाजत असताना ‘नसताना तू’ हे सॅड साँग प्रदर्शित झाले आहे. आर्या आंबेकरच्या सुमधुर आवाजातील या गाण्याला क्षितिज पटवर्धनचे शब्द लाभले असून पंकज पडघनने या गाण्याला संगीतबद्ध केले आहे.(‘Mylek’ tells the story of mother-daughter relationship)

सोनाली खरे आणि सनाया आनंदवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात दोघींमध्ये दुरावा आला असून मनात घालमेल सुरु आहे. त्यांच्या नात्यात हा दुरावा का आला आहे, याचे उत्तर मात्र प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळेल.

ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत, सोनाली आनंद निर्मित, प्रियांका तन्वर दिग्दर्शित ‘मायलेक’ या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, शुभांगी लाटकर, संजय मोने, बिजय आनंद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत.

या गाण्याबद्दल सोनाली खरे म्हणते, ” याआधी ‘असताना तू’ या आल्हाददायी गाण्यामधून मायरा आणि माझ्यामधील सुंदर नाते तुम्ही पाहिले. प्रेक्षकांनी या गाण्याला चांगला प्रतिसाद दिला. आता ‘नसताना तू ‘ हे भावनिक गाणेही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. काही कारणांमुळे या नात्यात दुरावा आला आहे. हे वय असे असते, जिथे मुलींच्या मनात चलबिचल असते, अनेक प्रश्न असतात, शंका असतात. त्यावर वेळीच चर्चा झाली नाही तर नकळत नात्यात दुरावा येऊ लागतो, हेच दाखवण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. कुटुंबातील प्रत्येकाने आवर्जून हा चित्रपट पाहावा.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी