32 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeव्हिडीओधनगर नेत्यांचं महत्व वाढलं, सर्व पक्षांनो त्यांना वापरा व फेका

धनगर नेत्यांचं महत्व वाढलं, सर्व पक्षांनो त्यांना वापरा व फेका

‘चला चला निवडणूक आली, धनगर नेत्यांना वापरून फेकायची वेळ झाली’… असं उत्सवाचं वातावरण सध्या महाराष्ट्रात दिसत आहे. महाराष्ट्रात साधारण दीडेक कोटी लोकसंख्या असलेला धनगर समाज हा प्रत्येक निवडणुकीत बऱ्याच मतदार संघात निर्णायक भूमिका बजावर असतो साधारण २२ लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचा मोठी लोकसंख्या आहे. त्यातील १३ मतदारसंघ तर असे आहेत की, धनगर समजाचं मतदान जिकडं झुकतं तिकडंचाच उमेदवार निवडून येतो.

‘चला चला निवडणूक आली, धनगर नेत्यांना वापरून फेकायची वेळ झाली’… असं उत्सवाचं वातावरण सध्या महाराष्ट्रात दिसत आहे(The importance of Dhangar leaders increased). महाराष्ट्रात साधारण दीडेक कोटी लोकसंख्या असलेला धनगर समाज हा प्रत्येक निवडणुकीत बऱ्याच मतदार संघात निर्णायक भूमिका बजावर असतो साधारण २२ लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचा मोठी लोकसंख्या आहे. त्यातील १३ मतदारसंघ तर असे आहेत की, धनगर समजाचं मतदान जिकडं झुकतं तिकडंचाच उमेदवार निवडून येतो.
भाजप, शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादीचा अजित पवार गट अशी तिन्ही पक्षांची महायुती निवडणुकीच्या रिंगणात आहे. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी व काँग्रेस या तिघांची महाविकास आघाडी. महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी जोरदार लढत होऊ घातलेली आहे.
त्यामुळं सत्ताधारी व विरोधक दोघांनाही एकेका मताची गरज आहे. त्यामुळंच साधारण करोडभर मतदार असलेल्या धनगर समाजाचं महत्व वाढलं आहे. हे मतदान आपल्याकडं खेचून आणण्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसलीय. त्यासाठी धनगर समाजातील नेत्यांना आपलंस करणं, त्यांना लाल गाजरं दाखवणं असा प्रयोग सुरूय.
भाजपनं धनगर समाजाचं अनेक प्रकारचं नुकसान केलंय. धनगर समाजाला पहिल्याचं कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो असं म्हटलं होतं. पण त्यांनी ते दिलं नाही. पण दुसऱ्या बाजूला अण्णा डांगे, प्रकाश शेंडगे अशा नेत्यांना भाजपनं संपवून टाकलं. आपण पापी आहोत. ज्यावेळी मत मागायला जावू त्यावेळी धनगर समाज आपल्या तोंडात शेण चारेल, हे भाजपला माहित आहे. म्हणून त्यांनी मग गोपीचंद पडळकर, राम शिंदे, विकास महात्मे, गणेश हाके यांना धनगर समाज जागृतीसाठी ठिकठिकाणी सभा घ्यायला लावल्या. गोपीचंद पडळकर यांची ही यात्रा जोरात सुरूय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी