33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeव्हिडीओनरेंद्र मोदी, अमित शाहांचं धोरण, शिवाजी महाराजांच नाव घ्या, अन् मराठी माणसांना...

नरेंद्र मोदी, अमित शाहांचं धोरण, शिवाजी महाराजांच नाव घ्या, अन् मराठी माणसांना संपवा

नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या सभांचा धडाका महाराष्ट्रात जागोजागी सुरूय प्रेक्षकहो तुम्ही या दोघांची भाषणं बारकाईनं ऐका. भाषणाची सुरूवातच ते छत्रपती शिवाजी महाराज की जय... या जयघोषणेने करतात. परभणीच्या सभेत तर नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांच्या घोषणेनंतर छत्रपती शाहू महाराजांची सुद्धा घोषणा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा ते घोषणा करतात. भाषणाच्या सुरूवातीला नरेंद्र मोदी मराठीत सुद्धा बोलतात.

नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या सभांचा धडाका महाराष्ट्रात जागोजागी सुरूय(Narendra Modi and Amit shah taking chhatrapati Sivaji Maharaj name) प्रेक्षकहो तुम्ही या दोघांची भाषणं बारकाईनं ऐका. भाषणाची सुरूवातच ते छत्रपती शिवाजी महाराज की जय… या जयघोषणेने करतात. परभणीच्या सभेत तर नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांच्या घोषणेनंतर छत्रपती शाहू महाराजांची सुद्धा घोषणा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा ते घोषणा करतात. भाषणाच्या सुरूवातीला नरेंद्र मोदी मराठीत सुद्धा बोलतात. नरेंद्र मोदी यांचं मराठीत बोलणं. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच नाव घेणं… हे कुठल्याही मराठी माणसाला भावतं. नरेंद्र मोदी ज्यावेळी आपल्या भाषणात या महापुरूषांचे उल्लेख करतात, तेव्हा माझाही उर अभिमानाने भरून येतो. पंतप्रधानांच्या तोंडून आपल्या मराठी भाषेचा, आपल्या महापुरूषांचा गौरव होणं ही किती मोठी अभिमानाची बाब आहे, असं वाटतं. नरेंद्र मोदी हे ढोंगी आहेत, हे माहित असून सुद्धा माझ्यासारख्या व्यक्तीची छाती त्यांच्या जयघोषणेने भरून येत असेल तर सामान्य मराठी माणूस मोदींच्या मागे किती येडा होत असेल याची कल्पना करा.
मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की, नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडगाळींचं खायचं दात आणि दाखवायचं दात वेगळे आहेत. या दोघांनी मराठी माणसांना, महाराष्ट्राला संपवायचे सगळे प्रयत्न अतिशय ताकदीने चालवलेले आहेत. कसे त्याची माहिती मी मुद्देसुदपणे मांडत आहे. तुम्ही सगळ्यांनी त्यावर जरूर विचार करा. तुम्हालाही ते निश्चितपणे पटतील.
हा व्हिडीओ पुढे पाहण्याअगोदर मी आपणांस कळकळीची आणि अतिशय नम्रपणे विनंती करतो की, आपण आमचा हा ‘लय भारी’ यू ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. आमचे फेसबूक पेज, एक्स हॅण्डल, इन्स्टाग्राम सुद्धा लाईक आणि फॉलो करा. त्यामुळं तुम्हांस असे अभ्यासू व रोचक व्हिडीओ पाहायला मिळतील. ‘खमकी भूमिका, खणखणीत आवाज’ हे आमचं ब्रीद आहे. त्यासोबत निष्ठा ठेवून आम्ही बेधडक व वास्तववादी पत्रकारिता करीत आहोत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी