टीम लय भारी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामना वृत्तपत्रातून शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी हटके शुभेच्छा दिल्या. मात्र नार्वेकर यांच्या या शुभेच्छाला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मजेशीर टीका केली आहे (Funny comment by Atul Bhatkhalkar on the occasion of Tejas Thackeray’s birthday).
शिवसेना सचिव नार्वेकर यांनी तेजस ठाकरे यांना महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्डस यांची उपमा दिली होती. त्यांच्या या शुभेच्छावर मजेशीर ट्विट करत भातखळकर म्हणाले, तेजस ठाकरे यांची तुलना सुनिल गावसकर, सचिन तेंडुलकर यांच्याशी केली असती तर आम्हालाही मराठी बाणा जपण्याचे समाधान मिळाले असते. तेजस ठाकरे यांना आमच्या मराठमोळ्या, मंगलमय आणि प्रेमाच्या शुभेच्छा असे ही भातखळकर म्हणाले.
तेजस ठाकरे यांची तुलना सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर यांच्याशी केली असती तर आम्हालाही मराठी बाणा जपण्याचे समाधान मिळाले असते मिलिंद नार्वेकर जी.
असो, तेजस ठाकरे यांना आमच्या मराठमोळ्या, मंगलमय आणि प्रेमाच्या शुभेच्छा!
💐💐💐💐💐💐 pic.twitter.com/MnVUUqycSF— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 7, 2021
धनंजय मुंडेंच्या निर्णयामुळे स्व. आर. आर. पाटलांची जागी झाली आठवण
‘विलासराव देशमुखांच्या जागी बाळासाहेब थोरातांना पाहतो’
आदित्य ठाकरे हे जेवढे राजकारणात सक्रिय आहेत तेवढे तेजस ठाकरे हे राजकारणात सक्रिय नाहीत. तेजस ठाकरे यांना वन्यजीव म्हणजेच ‘वाइल्ड लाईफ, हा त्यांचा आवडीचा विषय आहे. तेजस ठाकरे यांनी माहीम येथील बॉम्बे स्कॉटिश इथे शालेय शिक्षण घेतले. तसेच त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण हे मुंबईतील हिंदुजा कॉलेजमध्ये झाले (College education was done at Hinduja College, Mumbai).