33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयधनंजय मुंडेंच्या निर्णयामुळे स्व. आर. आर. पाटलांची जागी झाली आठवण

धनंजय मुंडेंच्या निर्णयामुळे स्व. आर. आर. पाटलांची जागी झाली आठवण

टीम लय भारी

मुंबई :  स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी आपल्या कामांतून तळागाळातील जनतेच्या मनत घर केले होते. त्यांनी असा एक निर्णय घेतला होता की, सामान्य लोकांनी तो कमालीचा उचलून धरला होता. स्वर्गीय आबांच्या या निर्णयाची पुनश्च आठवण झाली आहे, ती धनंजय मुंडेनी टाकलेल्या एका पाऊलामुळे (Decision of Dhananjay Munde R. R. Remembering Patil).

व्यसनमुक्तीसंदर्भात मुंडे यांनी गेल्या आठवड्यात एका बैठकीचे आयोजन केले होते. तरूणांमधील व्यसनाचे प्रमाण कमी व्हायला हवे. त्यासाठी जनजागृतीची गरज आहे. हा संवेदनशील विषय आहे, अशी भावना मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली.

आर. आर. आबा यांनीही उपमुख्यमंत्री असताना तरूणांच्या व्यसमुक्तीसाठी मोठा निर्णय घेतला होता. तरूण डान्स बारमध्ये मोठ्या प्रमाणात जाता. तिथे पैसा उडवतात. त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अशा अनेक तक्रारी आबांच्या कानावर यायच्या. त्यावर उपाय म्हणून त्यांनी डान्स बार बंदीचा निर्णय घेतला होता (The dance bar was banned).

धनंजय मुंडेंचा महत्वाचा निर्णय, तृतीयपंथियांची नोंदणी करणार

धनंजय मुंडेंच्या कामाचा झपाटा, मध्यरात्रीही जनतेचे सोडविले प्रश्न

या निर्णयामुळे आबांना प्रचंड त्रास झाला होता. धनदांडग्या लिकर लॉबीने आबांना त्रास दिला होता. न्यायालयाचेही निकाल सरकारच्या विरोधात गेले होते. त्यामुळे विधीमंडळात कायदा तयार करून डान्स बारबंदीचा निर्णय अंमलात आणला. आबांच्या या निर्णयाला विरोधी पक्षांनी साथ दिली होती.

‘तरूण व्यसनमुक्त झाला पाहीजे’ ही आबांची भूमिका होती. त्याच भूमिकेला साजेसे पाऊल धनंजय मुंडे यांनी टाकले असल्याचे मंत्रालयात बोलले जात आहे.

Decision of Dhananjay Munde R. R. Remembering Patil
धनंजय मुंडे आणि आर.आर.पाटील

नशाबंदी मंडळाच्या अनुदानात वाढ

नशाबंदी मंडळ ही शासनाच्या व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनामार्फत कार्यरत असलेली एकमेव अनुदानित संस्था आहे. राज्यातील भावी पिढी व्यसनाधीन होऊ नये यासाठी पूर्णवेळ कार्यरत असलेल्या या मंडळाचे 2018 पासूनचे 54 लाख 15 हजार अनुदान तात्काळ अदा करण्यात यावे, असा आदेश मुंडे यांनी दिला आहे (Such an order has been given by Munde).

शिवाय अनुदानातही दुपटीने वाढ करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. 30 लाखावरून 60 लाख इतके अनुदान आता देण्यात येईल.

या बैठकीस अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, सामाजिक न्याय विभागाचे सह सचिव दिनेश डिंगळे, नशाबंदी मंडळाचे अध्यक्ष व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर, कार्याध्यक्ष आयुक्त आर. के. गायकवाड, सरचिटणीस वर्षा विद्या विलास, कार्यकारिणी सदस्य प्रिया पाटील, डॉ. प्रभा तिरमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘विलासराव देशमुखांच्या जागी बाळासाहेब थोरातांना पाहतो’

Maharashtra minister Dhananjay Munde allegedly flouts COVID norms during birthday celebration

राज्य सरकारने सन 2020 – 21 या आर्थिक वर्षातील एकूण देय अनुदानापैकी 14.85 हजार इतके अनुदान वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अंमली पदार्थ विरोधी मोहिम आणि व्यसनाधिन व्यक्तींचे पुनर्वसन करण्यासाठी स्वयंसेवी संघटनांना तीन कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.

व्यसनमुक्ती धोरणाअंतर्गत प्रत्येक महसुली विभागास दोन याप्रमाणे व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या 12 संस्थांना प्रत्येकी 11 लाख अशी एकुण एक कोटी 32 लाख याचबरोबर राष्ट्रीय महात्मा गांधी पुरस्कार व सातवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तीन कोटी रक्कम वितरीत करण्यात येत असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी