30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयबाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात 7 सेवा सोसायटींच्या निवडणुका बिनविरोध

बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात 7 सेवा सोसायटींच्या निवडणुका बिनविरोध

टीम लय भारी

संगमनेर: सहकाराचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका हा आदर्शवत सहकाराचे मॉडेल तसेच सहकाराची पंढरी म्हणून ओळखला जातो. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सात गावांमधील  सहकारी सेवा सोसायटी यांची निवडणूक बिनविरोध झाली असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित भाऊ थोरात यांनी दिली आहे(Balasaheb Thorat, election of Co-operative Service Societies in seven villages without any objection).

याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वांवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा ग्रामीण विकासाचा मॉडेल ठरला आहे. ग्रामीण विकासात अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या सहकारी संस्था ह्या अत्यंत पारदर्शीपणे काम करत आहेत.

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात म्हणतात, मतदारांनी भाजप – आरएसएसला शिकविला धडा

आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड कारागृहात

त्यातून सर्वसामान्यांचा विकास व त्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करण्याचे काम संगमनेर मधील सहकारी संस्थांनी केले आहे. सुसंस्कृत राजकारणाची आदर्श तत्वांवर वाटचाल करत संगमनेर तालुक्यातील जाखुरी, कोंची, वाघापूर, कवठे धांदरफळ, चिखली, घुलेवाडी, सुकेवाडी या गावांमधील सहकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहे. निवडणुका बिनविरोध झाल्यामुळे या सहकारी सेवा सोसायटींचा विनाकारण होणारा खर्च वाचणार असून हा इतर गावांत पुढे आदर्श ठरला आहे.

Balasaheb Thorat : मराठी चित्रपट आणि चित्रपटगृहे पुनर्जीवित करण्याला प्राधान्य : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

RS bypoll: Nana Patole, Balasaheb Thorat meet Devendra Fadnavis

अहमदनगर जिल्ह्यातून अशी बिनविरोध निवड होणाऱ्या या पहिल्याच सात सेवा सोसायट्या ठरल्या आहे. जाखुरी, कोंची, वाघापुर, कवठे धांदरफळ, चिखली, घुलेवाडी, सुकेवाडी या सेवा सोसायट्या बिनविरोध होणार साठी तेथील पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले आहे. या बिनविरोध निवडींबद्दल या सेवा सोसायट्यांचे बाळासाहेब थोरात, आमदार डॉ सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव पा खेमनर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे , सौ.दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, सत्यजीत तांबे, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे ,बाबासाहेब ओहोळ, इंद्रजीत भाऊ थोरात, बापूसाहेब गिरी तालुका विकास अधिकारी अशोक थोरात आदींनी अभिनंदन केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी