33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
HomeराजकीयSharad Pawar meets Uddhav Thackeray : शरद पवार मातोश्रीवर, राजकीय वर्तुळात खळबळ

Sharad Pawar meets Uddhav Thackeray : शरद पवार मातोश्रीवर, राजकीय वर्तुळात खळबळ

टीम लय भारी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्री निवासस्थानी भेट घेतली आहे ( Sharad Pawar meets Uddhav Thackeray ). राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत केंद्रातील भाजप सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे बोलले जात आहे.

शरद पवार, उद्धव ठाकरे व संजय राऊत या तिघांमध्ये रात्री बराच वेळ चर्चा झाल्याचे बोलले जात आहे ( Sharad Pawar meets Uddhav Thackeray ).

Mahavikas Aghadi

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल शरद पवार व नारायण राणे या दोघांना राजभवनवर निमंत्रित केले होते. आदल्या दिवशी खासदार संजय राऊत हे सुद्धा राज्यपालांना भेटले होते. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी अचानक उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने ( Sharad Pawar meets Uddhav Thackeray )राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

‘महाविकास आघाडी’ सरकार अस्थीर करण्यासाठी भाजपचे नेते आतूर आहेत. सध्या मुंबईत ‘कोरोना’ रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. 32 हजार पेक्षा जास्त रूग्ण वाढले आहेत. या रूग्णांना सामावून घेण्यासाठी रूग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध नाहीत. त्यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. हे कारण पुढे करीत भाजप राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी ठाकरे यांची भेट घेतली असावी असा अंदाज आहे.

दुसऱ्या बाजूला ‘लॉकडाऊन’ शिथील करण्याबाबत शरद पवार आग्रही आहेत. परंतु उद्धव ठाकरे ‘लॉकडाऊन’ कायम ठेवण्यावर ठाम आहेत. या मुद्द्यावरूनही शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यात मतभिन्नता आहे. त्या अनुषंगाने सुद्धा ही भेट ( Sharad Pawar meets Uddhav Thackeray ) झाली असावी असाही कयास बांधला जात आहे.

पवार हे आजपर्यंत कधीही मातोश्रीवर गेले नव्हते. पहिल्यांदाच त्यांनी मातोश्रीवर पाऊल ठेवले ( Sharad Pawar meets Uddhav Thackeray ). त्या मागे काहीतरी मोठे कारण असावे असेही बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा

घर ताज्या घडामोडी गुप्त बैठकीसाठी शरद पवार मातोश्रीवर; महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? गुप्त बैठकीसाठी शरद पवार मातोश्रीवर; महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?

Governor : शरद पवारांच्या नाराजीनंतरही राज्यपालांनी केली मुख्यमंत्र्याच्या अधिकारक्षेत्रात घुसखोरी

Corona : शरद पवारांचे नरेंद्र मोदींना आणखी एक पत्र, शेती संकटात असल्याकडे वेधले लक्ष

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या कणखरपणामागे कार्यरत आहे पडद्यामागील ‘खास माणसां’ची फौज

Mahavikas Aghadi : उद्धव ठाकरे, अजितदादा, राजेश टोपे यांचा मोठा निर्णय, जगात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला मिळणार ‘ही’ सुविधा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी