30 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपचे नेते घरात रेमडेसिव्हीर, ऑक्सीजन तयार करतात का ? छगन भुजबळ यांचा...

भाजपचे नेते घरात रेमडेसिव्हीर, ऑक्सीजन तयार करतात का ? छगन भुजबळ यांचा सवाल

टीम लय भारी

मुंबई : रेमडेसिव्हीर इंजेक्शन अथवा ऑक्सीजन तयार करण्याचे काम देशातील कंपन्या करतात. त्याचे उत्पादन भाजपचे नेते स्वतःच्या घरात तयार करतात का ? असा संतप्त सवाल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे ( Chhagan Bhujbal asked question to BJP leaders ).

देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी ‘ब्रुक फार्मा’ कंपनीकडून रेमडेसीव्हीर इंजेक्शन्स आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर खासदार डॉ. सुजय विखे – पाटील यांनी रेमडेसीव्हीर यांनीही मोठ्या संख्येने रेमडेसीव्हीर इंजेक्शन आणली आहेत. त्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे ( Chhagan Bhujbal attacks on Devendra Fadnavis, Pravin Darekar and Dr. Sujay Vikhe Patil ).

‘आम्हीच रूग्णांची काळजी करतोय, असे भाजपच्या नेत्यांना दाखवायचे आहे. त्यासाठी ते असा खटाटोप करीत आहेत. पण भाजप कधीही देशाचे कल्याण करू शकत नाही, असे भुजबळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अजित पवारांवर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना जयंत पाटलांनी दिले चोख प्रतिउत्तर

पाकिस्तानातून भारतासाठी शोएब मलिकची प्रार्थना,‘अल्लाह भारतीयांना कोरोनाविरोधात लढण्यासाठी बळ दे..!’

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या थैमानामुळे सत्या नाडेला, सुंदर पिचाई हळहळले; मायक्रोसॉफ्ट-गुगल मदतीसाठी पुढे सरसावले

COVID-19 Information: Looking for a Remdesivir injection? Check out these websites, phone numbers to find them

विखे – पाटील यांनी ही इंजेक्शन्स कुठून आणली. मग आम्हीही पैसे गोळा करून अशी इंजेक्शन आणू शकत नाही का ?. सरकारी यंत्रणेकडून इंजेक्शन वाटप करण्याचे ठरविल्यानंतर त्याचे उल्लंघन का केले जात आहे, असाही सवाल भुजबळ  ( Chhagan Bhujbal ) यांनी केला आहे.

भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच येणारी इंजेक्शन्स सरकारच्या माध्यमातून लोकांना द्यायला हवीत, असाही सल्ला भुजबळ यांनी दिला ( Chhagan Bhujbal said, BJP leaders should meet to Uddhav Thackeray for Remdesivir Injection ).

डॉ. सुजय विखे पाटील यांनी आणलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनवरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही तोफ डागली आहे ( Jayant Patil attacks on Dr. Sujay Vikhe Patil over Remdesivir ). रूग्णांना कोणताही अपाय होऊ नये. रूग्णांना इंजेक्शन्स देताना ती योग्य आहेत का त्याची तपासणी व्हायला हवी. त्याची काळजी सरकारी यंत्रणा घेत असते. त्यामुळे कुणीही इंजेक्शन्स आणली तरी ती सरकारकडे जमा करायला हवीत, असे जयंत पाटील म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी