28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeराजकीयमंत्रालयातील ‘कोरोना’बाधित IAS अधिकारी झाले बरे

मंत्रालयातील ‘कोरोना’बाधित IAS अधिकारी झाले बरे

टीम लय भारी

मुंबई : दहा – बारा दिवसांपूर्वी ‘कोरोना’बाधित झालेले मंत्रालयातील एक प्रधान सचिव ( IAS ) आता पूर्ण बरे झाले आहेत. या IAS अधिकाऱ्यांवर ‘प्लाझ्मा’ पद्धतीने उपचार करण्यात आले होते. त्याला चांगले यश मिळाल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

‘प्लाझ्मा’ उपचार पद्धती प्रभावी ठरत आहे. पुण्यातही एका रूग्णावर ‘प्लाझ्मा’ पद्धतीने उपचार केले होते. तो रूग्ण सुद्धा बरा झाल्याचे टोपे म्हणाले.

Mahavikas Aghadi

मंत्रालयामध्ये आतापर्यंत जवळपास आठ लोकांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. त्यात दोन IAS अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्या व्यतिरिक्त अन्य काही कर्मचारी व सफाईगारांचा ‘कोरोना’बाधितांमध्ये समावेश आहे.

या व्यतिरिक्त दोन मंत्र्यांनाही ‘कोरोना’ची लागण झाली आहे. यातील यातील एक मंत्री पूर्णतः बरे झाले आहेत. दुसऱ्या मंत्र्यांना सोमवारी मुंबईतील लिलावती रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.

‘कोरोना’ची मजल मंत्रालयापर्यंत पोचल्यामुळे मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयामध्ये चोख साफसफाई केली जात आहे. सॅनिटायझरसारख्या रसायनांचा नियमित वापर केला जातो.

दालनाची चावीही IAS अधिकारी सोबत घेऊन जातात

‘कोरोना’च्या धास्तीमुळे मंत्रालयातील वरिष्ठ IAS अधिकारी सुद्धा कमालीची काळजी घेऊ लागले आहेत. काही सचिव तर आपल्या दालनाची चावी सुद्धा सोबत घेऊन जातात.

एरवी सचिव कार्यालयात येण्यापूर्वी शिपाई दालन उघडून ठेवतात. संध्याकाळी सचिव घरी परतले की शिपाई दालनाचा दरवाजा चावीने बंद करतात. ती चावी तळमजल्यावरील सुरक्षा रक्षकाकडे दिली जाते.

दुसऱ्या दिवशी पुन्हा शिपाई सुरक्षा रक्षकाकडून चावी घेऊन दालन उघडतात. यामध्ये शिपाई व सुरक्षा रक्षकांच्या कामाच्या वेळा बदलल्या तर चावी दोनपेक्षा जास्त लोकांकडून हाताळली जाते.

चावी अनेकांकडून हाताळली गेल्यामुळे ‘कोरोना’चा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मंत्रालयातील बहुतांश सचिव मंडळी दालनाची चावी सोबतच घेऊन जातात. स्वतः दालन उघडतात, अन् स्वतःच बंद करतात.

घरून पाणी आणायला विसरले, अन्…

‘कोरोना’ कुठुनही येऊ शकतो. पाण्याच्या बाटलीच्या पृष्टभागावर सुद्धा ‘कोरोना’ असू शकतो. त्यामुळे मंत्रालयातील अधिकारी मंत्रालयातील पाण्याच्या बाटल्यांना हातच लावत नाही. बहुतांश सगळेजण घरून पाणी घेऊन येतात.

एक उच्चपदस्थ अतिरिक्त मुख्य सचिव ( IAS ) सुद्धा नियमितपणे घरूनच पाणी आणतात. परंतु एके दिवशी ते घरून पाणी आणायला विसरले. मात्र त्यांनी स्वतःच्या कार्यालयातील पाणी घेतले नाही.

ते आपल्या दालनातून तडक मुख्य सचिवांच्या दालनात गेले. तेथील सुरक्षित असलेल्या दोन पाण्याच्या बाटल्या उचलल्या, अन् त्या स्वतःसाठी घेऊन आले.

मुख्य सचिवांकडे असलेल्या पाण्याच्या बाटल्यांना कोणताही धोका नाही, याची खात्री होती. म्हणूनच या अतिरिक्त मुख्य सचिवांनी मुख्य सचिवांकडून बाटल्या आणल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

IAS मनिषा म्हैसकरांच्या घरी दोन चिमुकल्या मुली, तरीही अधिकारी म्हणून ‘कोरोना’च्या लढाईत आघाडी

माजी IAS अधिकाऱ्याने आईच्या पुण्यतिथीच्या खर्चाची रक्कम दिली CM फंडाला

Ajit Pawar : अजितदादांकडे हसन मुश्रीफांनी आग्रह धरला, अन् लोकहिताची योजना अंमलात आली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी