30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रCoronavirus : ‘शरद पवार साहेब, आपण घराबाहेर पडू नका'

Coronavirus : ‘शरद पवार साहेब, आपण घराबाहेर पडू नका’

टीम लय भारी

मुंबई : मुंबईमध्ये ‘कोरोना’चे  ( Coronavirus ) संकट अधिकाधिक गहिरे होत चालले आहे. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काल घराबाहेर पडले. पवारांच्या तब्येतीची काळजी असलेल्या त्यांच्या चाहत्यांचा मात्र त्यामुळे जीव कासावीस झाला.

‘पवार साहेब तुम्ही आणखी काही दिवस घराबाहेर पडू नका’ असे आर्त आवाहन त्यांच्या चाहत्यांनी केले आहे.

‘कोरोना’च्या ( Coronavirus ) या संकटकाळात पवार यांनी ‘लॉकडाऊन’चे तंतोतंत पालन केले. आतापर्यंत ते आपल्या घरातून बिल्कूल बाहेर पडले नव्हते. ते सोशल मीडियातूनच लोकांशी संवाद साधायचे. तातडीच्या बाबतीत ते घरीच बैठका घ्यायचे. पण शुक्रवारी ते पहिल्यांदाच घराबाहेर पडले.

Coronavirus

वयाची ऐंशी गाठलेल्या पवारांनी स्वतःच्या तब्येतीला सांभाळणे गरजेचे आहे. ‘कोरोना’चा ( Coronavirus ) सर्वाधिक धोका बालक व वृद्धांना आहे. तरीही धोका पत्करून शरद पवार काल घराबाहेर पडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी दादर येथे बैठक घेतली.

केवळ बैठक घेऊनच ते थांबले नाहीत, ‘कोविड-19’ रूग्णांसाठी ( Coronavirus ) उभारण्यात आलेल्या वरळी व वांद्रे – कुर्ला संकुलातील सेंटरलाही त्यांनी मंत्र्यांसमवेत भेट दिली. रूग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या सुविधांची त्यांनी पाहणी केली.

यावेळी त्यांनी व सोबतच्या सर्व मंत्र्यांनी सोशल डिस्टन्शिंगचे पालन केले. तरीही या उतारवयात पवार यांनी धोका पत्करू नये अशा भावना त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Coronavirus : ‘शरद पवार साहेब, आपण घराबाहेर पडू नका'

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. ‘पवार साहेब तुम्ही आणखी काही दिवस घराबाहेर पडू नका. डिजिटलच्या माध्यमातून आपण सरकारला व समाजाला संदेश द्यावेत’ अशी विनंती लवांडे यांनी ट्विटद्वारे केली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील महापुरातही पवारांनी अशीच पाहणी केली होती

राज्यावर व देशावर संकट कोसळले की, त्यातून मार्ग काढण्यासाठी पवार नेहमी पुढाकार घेतात. गेल्या वर्षी कराड, सांगली व कोल्हापूरचा बराच भाग महापुराखाली गेला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत नव्हता. तरीही शरद पवार स्वतःहून पुरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले होते.

Coronavirus
बीकेसीमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरची पाहणी करताना शरद पवार

कराड, सांगली व कोल्हापुरातील अनेक गावांना त्यांनी भेटी दिल्या. एवढेच नव्हे तर, कित्येक दिवस त्यांनी तिथेच ठाण मांडले होते. 15 ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन सुद्धा त्यांनी एका पुरग्रस्त गावात साजरा केला होता.

सध्या ‘कोरोना’मुळे मुंबईकर हवालदिल झालेले आहेत. या संकटातून मार्ग काढण्यासाठी पवार यांनी धोका पत्करून रूग्णांसाठी उभारलेल्या सेंटरची पाहणी केली.

आढावा बैठकीत झालेली चर्चा

शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी दादर येथे बैठक झाली. या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आदी मंत्रीगण उपस्थित होते. मुख्य सचिव अजोय मेहता व अन्य अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

Coronavirus
शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या समवेत प्रमुख मंत्री व अधिकाऱ्यांची दादर येथे बैठक झाली

रविवारी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत आहे. चौथा टप्प्याचे स्वरूप केंद्र सरकार ठरवेल, पण राज्यात त्याची कशी अंमलबजावणी करायची याबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील कोणत्या भागात शिथिलता आणायची, रेड झोन्स, कंटेनमेंट झोन्समध्ये बंधने कशा रीतीने पाळायची यावरही चर्चा झाली.

लॉकडाऊनमुळे राज्यातील साखर उद्योगासंमोर आव्हान उभे राहिले आहे. याबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिल्याचे पवार यांनी सांगितले. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजबाबतही यावेळी चर्चा झाली. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात एका बाजूला कोविडशी ( Coronavirus ) झुंज द्यायची, तर दुसऱ्या आर्थिक घडी रूळावर आणायची अशीही चर्चा या बैठकीत झाली.

हे सुद्धा वाचा

Coronavirus : शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांसह प्रमुख मंत्र्यांची घेतली बैठक

Coronavirus : मुंबईतील कोरोना ‘हे ४ मंत्री’ रोखणार!

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या आमदारकीने भाजपच्या मनसुब्यांवर पाणी

Centre’s Package For Agriculture Sector Like A 5-Year-Plan: Sharad Pawar

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी