33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeक्रिकेटमोदी स्टेडियम बनले सुरक्षा छावणी, लक्ष भारत-पाकिस्तान लढतीकडे

मोदी स्टेडियम बनले सुरक्षा छावणी, लक्ष भारत-पाकिस्तान लढतीकडे

क्रिकेटप्रेमी देशांमध्ये एकदिवसीय वर्ल्डकपची धूम सुरू आहे. रविवारी भारताने ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात शनिवारी (१४ ऑक्टोबर) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होणार आहे. दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ आमने-सामने येणार असल्याने भारत आणि पाकिस्तानचे डोळे याच सामन्याकडे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा कडक बंदोबस्त करण्यात येत आहे. दोन क्रिकेट संघांमधील हा सामना असला तरी या लढतीला युद्धाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे हा महामुकाबला सामन्यासाठी अहमदाबाद सज्ज झाले आहे. सुरक्षेसाठी तब्बल ११ हजार सुरक्षासेवक तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी. एस. मलिक यांनी दिली आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना होत आहे. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. याचे मोठे दडपण अहमदाबाद पोलिसांवर आहे. त्यामुळे मोदी स्टेडियमच्या आत आणि बाहेर तसेच परिसरात तब्बल सात हजार पोलीस आणि चार हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

धमकीचा ईमेल आणि ५०० कोटींची मागणी

ही सर्व काळजी घेण्यास विशेष कारणही आहे. कारण मुंबई पोलिसांना आलेला धमकीचा  ईमेल. याईमेलमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजा करण्याची धमकी तसेच स्टेडियम उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एवढेच नाही तर धमकी देणाऱ्याने ५०० कोटींची खंडणी मागितली असून कुख्यात लॉरेन्स बिष्णोईला तुरुंगातून मुक्त करण्याची मागणी केली आहे. या धमकीनंतर अहमदाबाद पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांना आलेला हा धमकीचा ईमेल परदेशातून आल्याचेही स्पष्ट झाले आहे.

तेढ निर्माण होऊ नये याची काळजी

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे तेढ निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. तसे होऊ नये, यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये लाखभर प्रेक्षक येण्याची शक्यता आहे. अशावेळी कुठलाही तणाव निर्माण होऊ नये, याची काळजी पोलिसांना घ्यायची आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन दशकांत क्रिकेटच्या सामन्यावरून अहमदाबादमध्ये जातीय दंगली झालेल्या नाहीत. ही बाब लक्षात घेऊन वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी अहमदाबाद पोलिसांनी ११ हजार पोलीस आणि सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. यामुळे स्टेडियम परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त होणार आहे. या शिवाय बॉम्बशोधक आणि निकामी करणारे पथक, नॅशनल सिक्युरिटी गार्ड ड्रोनविरोधी पथकही स्टेडियममध्ये सज्ज असणार आहे.

हे ही वाचा

शिल्पाच्या नवऱ्याचा अजून एक कारनामा… राज कुंद्राने पॉर्नफिल्मबाबत केले वक्तव्य

अखेर ठरलं… अठरापगड जाती-जमाती आता मल्हारगड दसरा मेळाव्यासाठी एकवटणार

विधिमंडळ समित्यांमध्ये भाजपने बाजी मारली; भाजपला ५० टक्के, शिंदे, पवार गटाला २५: २५ टक्के वाटा !

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी