30 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रअखेर ठरलं... अठरापगड जाती-जमाती आता मल्हारगड दसरा मेळाव्यासाठी एकवटणार

अखेर ठरलं… अठरापगड जाती-जमाती आता मल्हारगड दसरा मेळाव्यासाठी एकवटणार

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजूरीत यावर्षीसुद्धा दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 29 ऑक्टोबर रोजी मल्हारगडाच्या पायथ्याशी हा दसरा मेळावा म्हणजेच मल्हारगड महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. मल्हारगड दसरा महामेळावा संयोजन समितिची बैठक पार पडली असून यंदाचा दसरा मेळावा हा महाराष्ट्रातील अनेक ज्वलंत प्रश्नांवर वाचा फोडणारा असेल, असा निर्धार यावेळी आयोजकांकडून करण्यात आला. मल्हारगड दसरा महामेळावा संयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ पडळकर यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेरायांची नगरी म्हणुन ओळखली जाणाऱ्या जेजूरीत मल्हारगड दसरा महामेळावा आयोजित केला जात आहे. यंदाही दसऱ्याच्या दिवशी या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने, रविवारी, (8 ऑक्टोबर) जेजूरी येथे मल्हारगड दसरा महामेळावा संयोजन समितीची बैठक पार पडली होती.

या बैठकीत दसरा महामेळाव्याबाबत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून मल्हारगड दसरा महामेळावा संयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ पडळकर यांनी, ‘यावर्षीचा दसरा मेळावा हा महाराष्ट्रातील अनेक ज्वलंत प्रश्नांवर वाचा फोडणारा असेल,’ असे प्रतिपादन केले आहे.

हे ही वाचा 

ठाण्यात शनिवारी बाबुराव बागूल यांच्या साहित्याचा जागर

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश, वैद्यनाथ तीर्थक्षेत्रासाठी 287 कोटी !

आरोग्य केंद्राला ‘सक्षमीकरणाचा डोस’ देण्याऐवजी खासगीकरणाचा सपाटा

“अठरापगड जाती – जमाती मधील समाजाच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि खंडेरायाच्या दरबारात आपल्या मागण्याचं साकडं घालण्यासाठी व सरकारला याची जाणीव करून देण्यासाठी लाखोच्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मल्हारभक्तांनी यावं,” असे आवाहन नवनाथ पडळकर यांनी केले.

तसेच, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील पशुपालक, शेतकरी, मेंढपाळ, कष्टकरी, कामगार, वारकरी, उद्योजक, अधिकारी, विद्यार्थी, पदाधिकारी, युवक, आणि कार्यकर्ते यांच्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा आहे असल्याचे आयोजकांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी