26 C
Mumbai
Saturday, December 2, 2023
घरक्रिकेटअनुष्का थेट स्टेडियममधून पाहणार 'विराट' खेळी

अनुष्का थेट स्टेडियममधून पाहणार ‘विराट’ खेळी

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माने हजेरी लावली. गुजरात येथील अहमदाबाद येथे सुरु झालेल्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये क्रिकेट मॅचचे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅच पाहण्यासाठी अनुष्का सकाळीच अहमदाबादला पोहोचली. अनुष्काचे विमानातील माजी पूर्व क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि दिनेश कार्तिकसोबतचे फोटो व्हायरल झाले आहे. दिनेश कार्तिकने इंस्टाग्राम या सोशल मीडियावर तिघांचा फोटो पोस्ट केला.

अहमदाबाद विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्थेत अनुष्काला क्रिकेट स्टेडियमला आणण्यात आले.
अनुष्का दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चा सुरु असताना काळ्या शर्ट, जॅकेट आणि पॅन्टमध्ये तिने स्वतःचे पोट शीताफिने लपवले. त्यामुळे अनुष्का दुसऱ्यांदा गर्भवती आहे की नाही, याचा कुणालाही पत्ता लागला नाही. दुपारी दोन वाजता क्रिकेट मॅचला सुरुवात झाली. या मॅचसाठी संपूर्ण देशात उत्सुकता आहे. या सगळ्यात अनुष्का गर्भवती आहे की नाही या सोशल मीडियावर पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dinesh Karthik (@dk00019)


सिनेअभिनेत्री अनुष्का शर्माने २०१८ साली प्रियकर क्रिकेटर विराट कोहलीशी लग्न केले. त्यांना वामिका नावाची अडीच वर्षांची मुलगी आहे. वामिकाचा जन्म ११ जानेवारी २०२१ रोजी मुंबईत झाला. अनुष्का आणि विराट वामिकासह आपले खासगी आयुष्य जगण्याला पसंती देतात. त्यामुळे वामिकाचे सोशल मीडियावर जास्त फोटो पाहायला मिळत नाही. मात्र त्यानंतर अनुष्काने मुलीच्या संगोपनासाठी चित्रपटातून ब्रेक घेतला.

हे ही वाचा 

भारत-पकिस्तान सामन्यावर कोणते विघ्न?

आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश

भारत-पाकिस्तान सामन्यावर ड्रोन्सची भेदक नजर

अनुष्का शेवटची तृप्ती दिमरीच्या ‘काला’ वेबसिरीजमध्ये एका खास कॅमिओमध्ये दिसली होती. ती सध्या ‘चकडा एक्सप्रेस’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान व्यस्त आहे. माजी भारतीय महिला क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. प्रोसित रॉय दिग्दर्शित या चित्रपटात अतुल शर्मा, अहमरीन अंजुम, डेव्ह बॅनिस्टर, भरत मिस्त्री, रेणुका शहाणे आणि दिव्येंदू भट्टाचार्य यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १६ डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी