27 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरराजकीयजरांगेंचे फेसबुक पेज कोणी केले बंद?

जरांगेंचे फेसबुक पेज कोणी केले बंद?

मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी गावातील सभेत एक गंभीर आरोप केला. हा आरोप त्यांच्या फेसबुक संदर्भात होता. आणि त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पाटील यांनीही सरकारला धारेवर धरले आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा समाज काही वर्षांपासून आक्रमक झाला आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी गावात बेमुदत उपोषण सुरू केले होते. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर सरकारने अजून ठोस निर्णय घेतलेला नाही. मात्र, ४० दिवसांत सकारात्मक पाऊल उचलण्याची ग्वाही दिली होती. या मुदतीला आता १० दिवस उरलेत, याची आठवण करून देण्यासाठी जरांगेची अंतरवाली सराटीत सभा झाली. यात त्यांनी त्यांचे सोशल मीडिया पेज बंद पाडल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात ट्वीट करत टीकेचे बाण सोडले आहेत.

अंतरवाली सराटी गावात सकाळी झालेल्या विराट सभेत मराठा आरक्षणाची मागणी करणारे जरांगे-पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र देत नाही, यामागे राज्यातील काही ओबीसी नेत्यांचा हात असल्याची चर्चा होती. त्यामुळे आता छगन भुजबळ आणि जरांगे-पाटील हमरातुमरीवर आले आहेत. यावेळी त्यांनी सभेत भुजबळांवर देखील निशाण साधला. एवढेच नाही तर त्यांनी त्यांचे सोशल मीडिया पेज सरकारने बंद पाडल्याचा आरोप त्यांनी केला. याचीच आता राजकीय चर्चा होऊ लागली आहे.

हेही वाचा 

जरांगेंचे राजकीय बॉस शरद पवार, गुणरत्न सदावर्ते यांचा गंभीर आरोप

अजितदादा… २४ तास ऑन ड्युटी

मराठ्यांना अंगावर घेऊ नका, जरांगेंचा सरकारला इशारा

अंतरवाली सराटी येथील सभेत भाषण करत असताना जरांगे-पाटील यांचे नेटवर्क घालवण्यात आले, त्यांचे फेसबुक पेजही बंद करण्यात आले होते, असा आरोप होत आहे. यावर स्वतः जरांगे-पाटील म्हणाले की, आता सुरू असलेल्या सभेत माझं इंटरनेट बंद करण्यात आलं, माझं फेसबुक बंद करण्यात आलं. काहीही केले तरी मोर्चा सुरू राहील, असे जरांगे म्हणाले. जरांगे यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांनी याबाबत ट्वीट करत सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढले आहेत.

ट्वीट करत काय म्हणाले रोहित पवार? 

अत्यंत पोटतिडकीने मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडणाऱ्या मनोज जरांगे-पाटलांनी आज लाखोंचा समाज आरक्षणासाठी एक करून दाखवला. त्यांच्या या ऐतिहासिक सभेची दखल घेण्याऐवजी पेड ट्रोलर्सच्या माध्यमातून खोट्या तक्रारी करून जरांगे-पाटलांचे फेसबुक पेज बंद करणे, सभेच्या भागात नेटवर्क बंद करणे, आपल्या प्याद्यांच्या मार्फत जरांगे पाटलांवर आरोप करणे असले प्रकार सुरू आहे. या महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांना शोभणारं नाही. काहीही करून आरक्षणाच्या मार्गात अडथळे आणण्यापेक्षा आपण सर्वजण सोबत आहोत हा विश्वास सरकारने मराठा समाजाला द्यावा, ही विनंती! राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी असे ट्वीट करत सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण सोडले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी